प्रातिनिधिक फोटो
ठाणे

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! २४ तास बंद राहणार पाणीपुरवठा

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे परिसरात येत्या गुरुवार ते शुक्रवार असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

सदर शटडाऊन कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.२६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं.२, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २५ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला