ठाणे

काैटुंबिक वादातून मुलीची हत्या करून पत्नीची आत्महत्या

डहाणूतील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिसणे शिपाई पाडा येथे नवरा-बायकोच्या भांडणात बायकोने आत्महत्या केली असून, त्यात त्यांच्या छोट्या मुलीला देखील जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी घडली.

Swapnil S

पालघर : डहाणूतील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिसणे शिपाई पाडा येथे नवरा-बायकोच्या भांडणात बायकोने आत्महत्या केली असून, त्यात त्यांच्या छोट्या मुलीला देखील जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी घडली. मनीषा जयेश राजड (२३) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. नवरा फिरायला जात असताना आपल्याला नेत नाही म्हणून रागाच्या भरात तिने आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीचा राहत्या घरात गळा आवळला. यात चिमुकली अनुश्री राजड (वय साडेचार महिने) हिचा मृत्यू झाला. तसेच तिने स्वतःदेखील नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

या घटनेमध्ये एका महिलेने नवरा फिरायला गेला. पण सोबत नेले नाही. म्हणून रागाच्या भरात स्वतःच्या लहानग्या मुलीचा गळा घोटून आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयेश राजड हा शिसने येथील रहिवाशी असून, त्याची पत्नी मनीषा जयेश राजड (२३) हिचा तिच्यासोबत वाद झाला होता. घटनास्थळी गणपत पिंगळे उपविभागीय अधिकारी, कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी नामदेव बंडगर यांनी भेट दिली.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण