ठाणे

तरुणीची ३१ व्या मजल्यावरून उडी

पाच महिन्यांपूर्वी ती तिच्या नातेवाईकांकडे घर काम करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी आली होती

Swapnil S

ठाणे : एका १९ वर्षीय मुलीने घोडबंदर येथील मानपाडा भागात सोमवारी ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. मृत मुलीचे नाव वर्षा उपाध्याय असे आहे. उत्तरप्रदेश येथून पाच महिन्यांपूर्वी ती तिच्या नातेवाईकांकडे घर काम करण्यासाठी तसेच शिक्षणासाठी आली होती. चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मानपाडा येथील निळकंठ ग्रीन परिसरात ओलिविया इमारतीच्या ३१ व्या मजल्यावर वर्षा ही तिच्या नातेवाईकांकडे राहण्यास आली होती. सध्या ती इयत्ता ११ वीचे शिक्षण घेत होती. ती शिक्षण घेत असतानाच नातेवाईकांकडे घरकाम करत होती. परंतु याठिकाणी तिचे मन रमत नव्हते. या बद्दल तिने आईला मोबाईलवरून संपर्क करून सांगितले होते. परंतु शिक्षण आणि भविष्यासाठी तिथेच राहा असे तिच्या आईने तिला सांगितले. रविवारी रात्री वर्षा हिने तिच्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा संपर्क होऊ शकला नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता ती उठली. त्यानंतर तिने घरातील सज्जाजवळ दोन ते तीन फेऱ्या मारल्या. त्यांनंतर सज्जाचा काचेचा दरवाजा उघडून तिने सज्जातून खाली उडी मारली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन