ठाणे

विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी तरुणाला अटक; आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण पूर्वे कोळसेवाडी परिसरातील १७ वर्षाची तरुणी त्याच भागातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे

वृत्तसंस्था

कल्याण पूर्वेतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ करुन तिचा भरदुपारी विनयभंग केला. याप्रकरणी अंबरनाथमधील चिखलोली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार कल्याणच्या तिकीट खिडकीसमोर घडला होता.

कल्याण पूर्वे कोळसेवाडी परिसरातील १७ वर्षाची तरुणी त्याच भागातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. दरारोज महाविद्यालयाला येत जात असताना अंबरनाथमधील चिखलोली भागात राहणारा राज तिवारी नामक २१ वर्षीय हा तरुण या तरुणीचा रस्त्यावर पाठलाग करुन तिचा मानसिक छळ करत असे. नाहक बदनामी नको, म्हणून तरुणीने शांत राहणे पसंत केले होते. परंतु दिवसागनिक या तरुणाचा त्रास वाढत चालल्याने ही तरुणी भयंकर त्रस्त झाली होती.

गुरुवारी दुपारी ही तरुणी महाविद्यालयातून कल्याण रेल्वे स्थानकाकडे येत असताना राज तिवारीने नेहमीप्रमाणे पाठलाग करुन तिला रस्त्यात गाठले आणि तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागताच राज याने तिला मारहाण करुन धमकी दिली. हा सगळा प्रकार कल्याण पूर्व रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ सुरू होता. प्रवाशांची गर्दी जमली होती.

मात्र, एकही प्रवासी या तरूणीच्या मदतीला धावला नाही. इतक्यात हा प्रकार सुरू असतानाच तरुणीचे वडील तेथे आले. त्यांनी मुलीला कुणी अनोळखी तरुण त्रास देत असल्याचे दिसले. ते मुलीजवळ गेले, तीने वडिलांना घडलेला सारा प्रकार सांगितला. वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेऊन आपल्या मुलीवर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी सांगितली. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे तिकीट घर परिसरात फिरत असलेल्या राज तिवारी याला तात्काळ बेड्या ठोकल्या. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मोठी बातमी! मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास थेट मेट्रोने; ३५ किमीच्या प्रकल्पाला सरकारची मंजुरी

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल