ठाणे

गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची कल्याणमध्ये बॅनरबाजी

वृत्तसंस्था

महागाई दिवसेंदिवस वाढत असून नुकतेच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. याचा निषेध म्हणून कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसने भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवली आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले यांच्या संकल्पनेनुसार कल्याणमध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये स्मृती इराणी यांचा २०१४ साली गॅस सिलिंडर ४१० रुपये असताना आंदोलन करतांना, आक्रोश करतांनाचा फोटो आणि आता गॅस सिलिंडर १०५३ रुपये झाल्यावर हसतानाचा फोटो लावण्यात आला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत असल्याने दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. २०१४ साली भाजपा नेत्या स्मृती इराणी या गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात आंदोलन करायच्या मात्र आता सिलिंडरच्या दरांनी हजारी ओलांडली असताना आता त्या काहीच बोलत नाहीत असा सवाल मनीष देसले यांनी उपस्थित केला आहे.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर