ठाणे

राणी बागेच्या धर्तीवर ठाण्यातही प्राणीसंग्रहालय; वन खात्याच्या १५० एकर जमिनीवर उभारणार उद्यान

मुंबईतील राणीची बाग तसेच नागपूरची महाराज बाग त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतही अशा प्रकारचे उद्यान लवकरच साकारण्यात येणार आहे.

Swapnil S

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात एक बैठक पार पडली. त्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता, मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देऊन वनखात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजुबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले आहे. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अश्या प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबाल वृध्दांना या उद्यानाचा फायदा होईल. काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आले असून, या उद्यानाचा आनंद घेण्यासाठी तरूण-तरूणी, अबाल-वृध्द येत असतात. त्याचप्रमाणे हावरे सिटी येथे प्राणीसंग्रहालय व उद्यान झाल्यास त्याचा आंनद शाळकरी मुलांना व अबालवृध्द तसेच नागरिकांना मिळू शकतो.

त्यानुसार, या १५० एकर जागेवर बाबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुध्दा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वनखात्याच्या नियमानुसार, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे, असाही अभिप्राय वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला.

मुंबईतील राणीची बाग तसेच नागपूरची महाराज बाग त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतही अशा प्रकारचे उद्यान लवकरच साकारण्यात येणार आहे.

- प्रताप सरनाईक, आमदार

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी