मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय! ५ मिनिटांत तयार होणारे 'केळ्याचे पॅनकेक'

रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं, हा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. हलकं, पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा नाश्ता हवा असतो, ज्यामुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल आणि मुलांना दिवसभर भरपूर ऊर्जा मिळेल. अशाच परिस्थितीत, केळ्याचे पॅनकेक हा एक उत्तम पर्याय ठरतो.
मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय! ५ मिनिटांत तयार होणारे 'केळ्याचे पॅनकेक'
मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय! ५ मिनिटांत तयार होणारे 'केळ्याचे पॅनकेक'
Published on

रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं, हा प्रश्न प्रत्येक आईला पडतोच. हलकं, पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा नाश्ता हवा असतो, ज्यामुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल आणि मुलांना दिवसभर भरपूर ऊर्जा मिळेल. अशाच परिस्थितीत, केळ्याचे पॅनकेक हा एक उत्तम पर्याय ठरतो. हे पॅनकेक तयार करायला खूप सोपे आहेत, त्यात नैसर्गिक साखर आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. चविष्ट आणि मुलांच्या आवडीनुसार तयार होणारे हे पॅनकेक, नाश्त्याच्या वेळेत आईसाठीही सोपे आणि जलद पर्याय ठरतात. चला तर मग जाणून घेऊया केळ्याचे पॅनकेक तयार करण्याची सोपी रेसिपी...

मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय! ५ मिनिटांत तयार होणारे 'केळ्याचे पॅनकेक'
कंटाळवाण्या दुधी भोपळ्याला द्या टेस्टी ट्विस्ट! जाणून घ्या दुधी कटलेटची सोपी रेसिपी

साहित्य :

  • गव्हाचं पीठ – १ कप

  • दूध – २ कप

  • दुधावरची साय – २ टेबलस्पून

  • साखर – ३/४ वाटी

  • वेलची पूड – १/२ टिस्पून

  • केळी – २

  • मीठ – चवीनुसार

  • तूप – पॅनवर भाजण्यासाठी

मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय! ५ मिनिटांत तयार होणारे 'केळ्याचे पॅनकेक'
Quick Snack Recipe: मिनिटांत बनवा क्रिस्पी कॉर्न-साबुदाणा बॉल्स

कृती :

सर्वप्रथम मिक्सरमध्ये केळी मॅश करून बारीक करून घ्या. त्यात गव्हाचं पीठ, साखर, वेलची पूड, दूध, दुधावरची साय आणि मीठ घालून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा. तयार मिश्रण एका भांड्यात घेऊन पॅन गरम करा आणि त्यावर थोडं तूप घालून पॅनकेक भाजा. पॅनकेक दोन्ही बाजूने सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजल्यावर तयार आहेत. गरम गरम पॅनकेक सर्व्ह करा; मुलांच्या डब्यासाठी थंड करून ठेवले तरी चालेल.

logo
marathi.freepressjournal.in