कंटाळवाण्या दुधी भोपळ्याला द्या टेस्टी ट्विस्ट! जाणून घ्या दुधी कटलेटची सोपी रेसिपी

जर तुम्हालाही दुधीची भाजी खायचा कंटाळा आला असेल, तर आता ती वेगळ्या पद्धतीने खा- कुरकुरीत ‘दुधी कटलेट’ म्हणून! चला, जाणून घेऊया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.
कंटाळवाण्या दुधी भोपळ्याला द्या टेस्टी ट्विस्ट! जाणून घ्या दुधी कटलेटची सोपी रेसिपी
एआयने बनवलेली प्रतिमा
Published on

दुधी भोपळ्याचं नाव ऐकलं की बऱ्याच जणांचा चेहरा पडतो. कारण ही भाजी अनेकांना फारशी आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, दुधी म्हणजे केवळ चव नव्हे तर आरोग्याचं खजिनाच आहे! यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते, आणि त्याचबरोबर यात अनेक पोषक घटकही असतात.

जर तुम्हालाही दुधीची भाजी खायचा कंटाळा आला असेल, तर आता ती वेगळ्या पद्धतीने खा- कुरकुरीत ‘दुधी कटलेट’ म्हणून! चला, जाणून घेऊया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य

  • ३०० ग्रॅम किसलेला दुधी भोपळा

  • १ बारीक चिरलेला कांदा

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • ½ चमचा जिरे

  • ½ चमचा हळद पावडर

  • ½ चमचा लाल तिखट

  • ½ चमचा आले-लसूण पेस्ट

  • ½ चमचा मैदा (किंवा ब्रेडक्रंब)

  • ½ चमचा लिंबाचा रस

  • मूठभर ताजी कोथिंबीर

  • रवा आणि चिमूटभर मीठ (कोटिंगसाठी)

  • तळण्यासाठी तेल

कंटाळवाण्या दुधी भोपळ्याला द्या टेस्टी ट्विस्ट! जाणून घ्या दुधी कटलेटची सोपी रेसिपी
रोज खाल्ली तरी आवडेल अशी भेंडीची भाजी! पाच वेगवेगळ्या चविष्ट रेसिपी

कृती

सर्वप्रथम दुधी भोपळा किसून घ्या. एका मोठ्या भांड्यात किसलेला दुधी, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, मैदा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे कटलेट बनवा आणि त्यांना रवा व चिमूटभर मीठाच्या मिश्रणात हलकेच बुडवा, जेणेकरून बाहेरील भाग कुरकुरीत बनेल. आता कढईत तेल गरम करून हे कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. काही मिनिटांतच स्वादिष्ट, कुरकुरीत आणि हेल्दी दुधी कटलेट तयार होतील.

logo
marathi.freepressjournal.in