गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी… काळी वेलची करते 'हे' सगळे त्रास दूर; जाणून घ्या पचनापासून हृदयापर्यंतचे जबरदस्त फायदे

काळ्या वेलचीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे शरीराला आतून मजबूत करतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण देतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास काळी वेलची रोजच्या आहारातून आरोग्याला मोठा फायदा देऊ शकते.

Published on

वेलचीला मसाल्यांची राणी म्हंटले जाते. तिचा दरवळ आणि चव कोणत्याही पदार्थाला खास बनवते. पण अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे, वेलची केवळ स्वयंपाकापुरती मर्यादित नाही, तर ती आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः काळी वेलची (मोठी वेलची) आयुर्वेदात शतकानुशतके औषधी घटक म्हणून वापरली जाते.

काळ्या वेलचीमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे शरीराला आतून मजबूत करतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण देतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास काळी वेलची रोजच्या आहारातून आरोग्याला मोठा फायदा देऊ शकते.

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म

काळ्या वेलचीच्या बियांपासून काढलेल्या तेलामध्ये जंतुनाशक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीरातील हानिकारक जीवाणू आणि बुरशी नष्ट होण्यास मदत होते. नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी… काळी वेलची करते 'हे' सगळे त्रास दूर; जाणून घ्या पचनापासून हृदयापर्यंतचे जबरदस्त फायदे
महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

काळी वेलची शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे लिव्हरवरील ताण कमी होतो आणि त्याचे कार्य सुधारते. फॅटी लिव्हर किंवा लिव्हर कमकुवत झालेल्या व्यक्तींना काळी वेलची उपयुक्त ठरू शकते.

दात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी

काळी वेलची दात आणि हिरड्यांच्या आरोग्याची काळजी घेते. दातांच्या संसर्गापासून संरक्षण करते आणि तोंडातील दुर्गंधी कमी करते. तिचा तीव्र सुगंध तोंडात दीर्घकाळ ताजेपणा टिकवून ठेवतो.

किडनी आणि मूत्रमार्गासाठी फायदेशीर

काळी वेलची लघवीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. बॅक्टेरियाची वाढ रोखून मूत्रमार्ग संसर्गाचा धोका कमी होतो. वारंवार यूटीआयचा त्रास होणाऱ्यांसाठी ती उपयोगी ठरू शकते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर 

काळी वेलची रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या, उष्माघात आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास हृदय दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत मिळते.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

गॅस, पोटफुगी, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी काळी वेलची फायदेशीर ठरते. ती पचन सुधारते, भूक वाढवते आणि पोटातील अल्सरचा धोका कमी करण्यास मदत करते.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत

गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी… काळी वेलची करते 'हे' सगळे त्रास दूर; जाणून घ्या पचनापासून हृदयापर्यंतचे जबरदस्त फायदे
केस गळतात? महागड्या हेअर ट्रीटमेंट सोडा, 'शेपू' खा! ऋजुता दिवेकरने सांगितले भन्नाट फायदे

काळी वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुधारते. रक्तप्रवाह शुद्ध ठेवण्यास मदत होते, कॅफिनसारखे घातक घटक कमी होतात आणि शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते.

आहारात काळी वेलची कशी वापरावी?

• भात, पुलाव किंवा बिर्याणी शिजवताना उकळत्या पाण्यात एक वेलची टाका
• सूप, भाज्या, स्ट्यूमध्ये वेलची पावडर वापरा
• टिक्का, कबाब किंवा मसालेदार पदार्थांमध्ये वापर करता येतो
• गोड पदार्थांमध्ये म्हणजे फिरणी, हलवा, रबडी, गुलाब जाममध्ये स्वाद वाढवते
• चहा, हर्बल टी, थंडाई किंवा हळदीच्या दुधात घालून सेवन करता येते
• मधासोबत घेतल्यास सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो

किती प्रमाणात घ्यावी?

दररोज सुमारे ३ ग्रॅम काळी वेलची पुरेशी मानली जाते. मात्र, सेवनानंतर अॅलर्जी, पोटदुखी किंवा त्वचेची समस्या जाणवत असल्यास त्वरित वापर थांबवावा.

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली काळी वेलची ही केवळ मसाला नाही, तर आरोग्यासाठीचा आयुर्वेदिक खजिना आहे. योग्य प्रमाणात आणि नियमित वापर केल्यास ती शरीराला आतून बळकट ठेवण्यास नक्कीच मदत करू शकते.

गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी… काळी वेलची करते 'हे' सगळे त्रास दूर; जाणून घ्या पचनापासून हृदयापर्यंतचे जबरदस्त फायदे
डायबिटीज असणाऱ्यांनी लक्ष द्या! ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान; वाचा कोणते ड्रायफ्रूट्स आहेत फायद्याचे

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य माहितीवर आधारित आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in