

सकाळची सुरुवात हेल्दी आणि फ्रेश ड्रिंकने करायची असेल, तर गाजर आणि कोथिंबिरीपासून तयार होणारा हा पौष्टिक ज्यूस उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि शरीरासाठी उपयुक्त वनस्पती घटकांनी भरलेला हा डिटॉक्स ड्रिंक इम्युनिटी वाढवण्यास, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. विशेष म्हणजे हा ज्यूस अवघ्या काही मिनिटांत घरच्या घरी सहज तयार करता येतो.
साहित्य :
४ ते ५ गाजर (किसलेले)
कोथिंबीर
अर्धा चमचा आले
चवीनुसार मीठ
चिमूटभर मिरीपूड
१ चमचा लिंबाचा रस (ऐच्छिक)
आवश्यकतेनुसार पाणी किंवा बर्फाचे तुकडे
कृती :
सर्वप्रथम गाजर, कोथिंबीर आणि आले मिक्सरमध्ये घालून एकत्र ब्लेंड करा. आवश्यकतेनुसार पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालून ज्यूसची कन्सिस्टन्सी पातळ करा. त्यानंतर त्यात मीठ, मिरीपूड आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित हलवा. तयार ज्यूस लगेच सर्व्ह करा.
ज्यूसचे फायदे :
शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते.
त्वचा चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
इम्युनिटी वाढवण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यास उपयोगी पडते.
टिप्स :
अधिक फ्रेश चव हवी असल्यास काही पुदिन्याची पाने घालू शकता.
साखर टाळून नैसर्गिक चव ठेवल्यास हा ज्यूस अधिक हेल्दी ठरतो.
सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस पिल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
ज्यूस बनवल्यानंतर लगेच पिणे उत्तम, त्यामुळे पोषक घटक टिकून राहतात.