मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय; चिझ-गार्लिक पराठ्याची ही सोपी रेसिपी नोट करून घ्या

रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर चिझ-गार्लिक पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अवघ्या १० मिनिटांत तयार होणारी ही सोपी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय; चिझ-गार्लिक पराठ्याची ही सोपी रेसिपी  नोट करून घ्या
मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय; चिझ-गार्लिक पराठ्याची ही सोपी रेसिपी नोट करून घ्या'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सकाळच्या नाश्त्यात रोज तेच पोहे, उपमा किंवा इडली-डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर आज काहीतरी वेगळं ट्राय करा. कमी वेळात तयार होणारा आणि चवीसोबतच पोटभरही वाटणारा चिझ-गार्लिक पराठा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठीही योग्य आहे.

दिवसभर उत्साही राहण्यासाठी सकाळचा पौष्टिक नाश्ता महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे बाहेरचे पदार्थ मागवण्यापेक्षा घरच्या घरी झटपट तयार होणाऱ्या रेसिपींचा पर्याय निवडणे फायदेशीर ठरते. चिझ, लसूण आणि कोथिंबिरीच्या चवीने भरलेला हा पराठा अवघ्या काही मिनिटांत तयार होतो.

मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय; चिझ-गार्लिक पराठ्याची ही सोपी रेसिपी  नोट करून घ्या
बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद

साहित्य

  • गव्हाचे पीठ

  • बटर

  • बारीक चिरलेला लसूण

  • कोथिंबीर

  • चिली फ्लेक्स

  • किसलेले चीज

  • मीठ

  • तूप

मुलांच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय; चिझ-गार्लिक पराठ्याची ही सोपी रेसिपी  नोट करून घ्या
Breakfast Recipe : भाजणीचा त्रास नाही; झटपट बनवा हिरव्या मुगाचे खमंग थालीपीठ

कृती
सुरुवातीला गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून मऊसर पीठ मळून घ्या. एका वाटीत बटर, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि किसलेले चीज एकत्र करून सारण तयार करा.

यानंतर पिठाचा गोळा घेऊन त्याची छोटी पोळी लाटा. त्यामध्ये तयार केलेले सारण भरून कडा बंद करा आणि पुन्हा हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.

तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. वरून थोडे तूप किंवा बटर लावल्यास चव अधिक खुलते. गरमागरम पराठा दही, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

झटपट तयार होणारा हा चिझ-गार्लिक पराठा सकाळच्या नाश्त्याला नवी चव देईल आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरेल.

logo
marathi.freepressjournal.in