Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी

गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून तयार केला जाणारा ठेकुआ पारंपरिक पद्धतीने तेलात किंवा तुपात तळला जातो. मात्र...
Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी
Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

छठपूजेचा सण म्हटलं की पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू होते. या सणात 'ठेकुआ' या गोड पदार्थाला विशेष महत्त्व आहे. गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून तयार केला जाणारा ठेकुआ पारंपरिक पद्धतीने तेलात किंवा तुपात तळला जातो. मात्र, जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळायचे असेल तर आता हा पदार्थ एअर फ्रायरमध्येही बनवता येतो. विशेष म्हणजे, या पद्धतीत जास्त तेल वापरण्याची गरज नसते आणि ठेकुआला छान सोनेरी रंगासह कुरकुरीत पोत मिळतो. चला तर मग, जाणून घेऊया एअर फ्रायरमध्ये ठेकुआ बनवण्याची सोपी रेसिपी.

Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी
Daily Travel Tips : अचानक ट्रेन रखडली? बॅगेत ठेवा 'या' वस्तू; प्रवासात येतील कामी

ठेकुआ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १०० ग्रॅम गव्हाचे पीठ

  • १०० ग्रॅम किसलेले सुके खोबरे

  • १ चमचा बडीशेप

  • १ चमचा तूप

  • आवश्यकतेनुसार गुळाचा पाक

  • चिमूटभर बेकिंग पावडर

  • आवश्यकतेनुसार पाणी

Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी
Skin Care : चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळते का? करीना-करिश्माच्या सवयींबाबत तज्ज्ञ सांगतात...

एअर फ्रायरमध्ये ठेकुआ बनवण्याची कृती :

१. पीठ मळून घ्या : सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, किसलेले सुके खोबरे, बडीशेप आणि तूप घालून एकत्र मिसळा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार गुळाचा पाक आणि चिमूटभर बेकिंग पावडर घाला.

२. घट्ट पीठ तयार करा : सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ एकत्र येत नसेल तर थोडे पाणी घालू शकता. मात्र, पीठ जास्त मऊ करू नका.

३. ठेकुआला आकार द्या : तयार पिठाचे छोटे गोळे करून त्यांना अंडाकृती आकार द्या. त्यानंतर पारंपरिक ठेकुआच्या साच्यावर हे गोळे दाबून त्यावर नक्षी तयार करा. साचा नसल्यास हातानेही आकार देता येतो.

Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी
Skin Care : ग्लोइंग स्किनसाठी फेस मसाज करता? त्वचेनुसार योग्य स्टोन कसा निवडाल?

४. एअर फ्रायरमध्ये भाजून घ्या : एअर फ्रायर आधी गरम करून घ्या. त्याच्या बास्केटमध्ये ठेकुआ व्यवस्थित अंतर ठेवून ठेवा. काही मिनिटे एअर फ्राय करा. ठेकुआला सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणा आल्यावर ते बाहेर काढा. वेळ आणि तापमान एअर फ्रायरच्या क्षमतेनुसार बदलू शकते.

५. थंड झाल्यावर सर्व्ह करा : तयार ठेकुआ काही वेळ थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याचा कुरकुरीतपणा अधिक जाणवतो. त्यानंतर छठपूजेच्या प्रसादासाठी किंवा गोड पदार्थ म्हणून सर्व्ह करा.

ठेकुआ अधिक खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी टिप्स :

  • पीठ घट्ट मळा : ठेकुआचे पीठ खूप सैल किंवा मऊ असल्यास त्याचा आकार बिघडू शकतो. त्यामुळे पीठ घट्टसर ठेवा.

  • गुळाचा पाक हळूहळू घाला : एकदम जास्त पाक घालण्याऐवजी थोडा थोडा घालून पीठ मळा.

  • बास्केटमध्ये अंतर ठेवा : एअर फ्रायरमध्ये ठेकुआ एकमेकांना चिकटणार नाहीत अशा पद्धतीने ठेवा. त्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातील.

  • जास्त वेळ शिजवू नका : ठेकुआला सोनेरी रंग आला की ते बाहेर काढा. जास्त वेळ ठेवल्यास ते कडक किंवा जास्त भाजले जाऊ शकतात.

  • पूर्ण थंड झाल्यावर साठवा : ठेकुआ पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. त्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा टिकण्यास मदत होईल.

Chhath Puja Special : तळण्याची गरज नाही! एअर फ्रायरमध्ये बनवा बिहारचा लोकप्रिय ठेकुआ; जाणून घ्या सोपी रेसिपी
Smoothie Recipe : फळं, दही अन् बदाम; पौष्टिक स्मूदी बनवण्यासाठी फॉलो करा 'ही' सोपी रेसिपी

अशाप्रकारे पारंपरिक चवीचा ठेकुआ एअर फ्रायरमध्ये कमी तेलात तयार करता येतो. छठपूजेसाठी यंदा ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)