ढोकळा खाणाऱ्यांनी एकदा हे नक्की वाचा; शरीरावर होतो असा परिणाम

नाश्त्यात ढोकळा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण तो नियमित खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? पचन, वजन नियंत्रण, प्रथिने आणि इतर पोषकतत्त्वांच्या दृष्टीने ढोकळ्याचे फायदे आणि अति सेवनाचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घ्या.
ढोकळा खाणाऱ्यांनी एकदा हे नक्की वाचा; शरीरावर होतो असा परिणाम
Published on

सकाळच्या नाश्त्यात हलकं, चविष्ट आणि पटकन पचणारं काहीतरी खाण्याचा अनेकांचा कल असतो. अशावेळी ढोकळा हा अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. वाफेवर शिजवला जाणारा हा गुजराती पदार्थ चवीसोबतच पौष्टिकतेसाठीही ओळखला जातो. मात्र तो नियमित खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न अनेकांना पडतो.

अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज यांच्या मते, ढोकळा हा चण्याचे पीठ आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून तयार होणारा आंबवलेला पदार्थ आहे. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील पोषकतत्त्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे तळलेल्या नाश्त्यांच्या तुलनेत ढोकळा हा अधिक हलका, पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

ढोकळा खाण्याचे फायदे

  • पचनक्रियेला मदत - ढोकळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.

ढोकळा खाणाऱ्यांनी एकदा हे नक्की वाचा; शरीरावर होतो असा परिणाम
संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा
  • प्रथिनांचा चांगला स्रोत - चण्याच्या पिठामुळे ढोकळ्यात प्रथिने मिळतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक संतुलित पर्याय ठरू शकतो.

  • कमी तेल, अधिक पौष्टिकता - ढोकळा वाफेवर शिजवला जात असल्याने त्यात तेलाचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही तो फायदेशीर ठरू शकतो.

  • शरीराला मिळतात आवश्यक पोषकतत्त्वे - ढोकळ्यामध्ये बी-समूह जीवनसत्त्वे, लोह, पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची पोषकतत्त्वे आढळतात. ही शरीराच्या विविध कार्यांसाठी उपयुक्त मानली जातात.

  • आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर - आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे तयार होणारे उपयुक्त घटक पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही आधार देतात.

रोज ढोकळा खाणे योग्य आहे का?

तज्ज्ञांच्या मते, माफक प्रमाणात ढोकळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणताही पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

अति सेवनाचे हे दुष्परिणाम होऊ शकतात

  • पोट फुगणे

  • बद्धकोष्ठतेची समस्या

  • पोटात अस्वस्थता

  • काही व्यक्तींमध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे वाढणे

ढोकळा खाणाऱ्यांनी एकदा हे नक्की वाचा; शरीरावर होतो असा परिणाम
Health Tips : सकाळी उपाशीपोटी भिजवलेलं अंजीर खा; थकवा, कमजोरी आणि पचनाच्या तक्रारींपासून मिळेल आराम

किती प्रमाणात खावे?

ढोकळा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असला तरी तो मुख्य जेवणाचा कायमस्वरूपी पर्याय बनवणे योग्य नाही. आठवड्यातून एक-दोन किंवा तीन वेळा संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन करता येते. यासोबत भाज्या, फळे आणि इतर पोषक पदार्थांचाही आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

हलका, चविष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे ढोकळा नक्कीच आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. मात्र कोणत्याही पदार्थाप्रमाणे त्याचाही योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणूनच आनंद घ्यावा.

logo
marathi.freepressjournal.in