Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल

योग्य आहार आणि काही साध्या सवयींच्या मदतीने फराळाचा आनंद घेत आरोग्यही जपता येऊ शकते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.
Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाची लगबग, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी आलीच! चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी अशा आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. मात्र, सणाच्या उत्साहात अनेकदा खाण्यावर नियंत्रण राहत नाही. आधीच वजन वाढण्याची चिंता, रक्तातील साखरेची पातळी किंवा इतर आरोग्यविषयक तक्रारी असतील, तर फराळ खाताना अधिक काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ दिवाळीत आवडते पदार्थ खाणे टाळावे असा नाही. योग्य आहार आणि काही साध्या सवयींच्या मदतीने फराळाचा आनंद घेत आरोग्यही जपता येऊ शकते. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali 2026 : दिन दिन दिवाळी, सुख-समृद्धी नांदो घरोघरी! प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा अन् सुंदर HD कार्ड्स

१. सणाच्या दिवसांतही व्यायाम टाळू नका

दिवाळीच्या सुट्ट्या आणि पाहुण्यांची ये-जा यामुळे अनेकदा रोजच्या व्यायामात खंड पडतो. मात्र, या दिवसांत नेहमीपेक्षा जास्त खाणे होत असल्याने शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेअभावी मोठा व्यायाम शक्य नसेल, तरी चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने यासाठी थोडा वेळ काढा. नियमित हालचालीमुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.

Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali 2026 : दिवाळीत मिठाई खाताना सावधान! भेसळ ओळखण्यासाठी करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

२. फराळासोबत फळे आणि भाज्यांचाही आहारात समावेश करा

दिवाळीत केवळ तळलेले आणि गोड पदार्थ खाण्याऐवजी ताज्या हंगामी फळांना, कच्च्या भाज्यांना आणि सलाडला ताटात जागा द्या. वाफवलेल्या भाज्यांचाही आहारात समावेश करू शकता. या पदार्थांमधून शरीराला फायबर आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे फराळासोबत संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali Sweet Recipe : केशराचा सुगंध अन् खव्याची चव; दिवाळीसाठी बनवा खास मलाई पेढे

३. गोड पदार्थ खाताना इतर पदार्थांचे प्रमाण सांभाळा

दिवाळीत लाडू, करंजी, शंकरपाळी यांसारखे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी पोळी, भात आणि भाकरी यांसारख्या कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे प्रमाणही लक्षात घ्या. आहारात डाळी, कडधान्ये, पनीर यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा आणि फायबरयुक्त भाज्यांचा समावेश करा. मात्र, गोड पदार्थ खाल्ल्यामुळे जेवणातील इतर पोषक घटक पूर्णपणे टाळू नका.

Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali 2026 : डाएट करणाऱ्यांसाठी दिवाळीत बनवा गुळाची बेसन बर्फी; कमी वेळेत तयार होणारी सोपी रेसिपी

४. दिवसभर पुरेसे पाणी प्या

सणाच्या धावपळीत अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी प्या. यामुळे शरीराचे सामान्य कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

Diwali Health Tips : फराळ खाताना वजन वाढण्याची चिंता सतावतेय? आहारात करा 'हे' छोटे बदल
Diwali 2026 : दिवाळीत घरीच बनवा मखाना-काजूची स्वादिष्ट बर्फी; पाहा सोपी रेसिपी

दिवाळीचा आनंद घ्या, पण आरोग्यही जपा!

दिवाळीचा फराळ म्हणजे केवळ खाणे नव्हे, तर कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची संधी आहे. त्यामुळे आवडते पदार्थ खाताना त्यांचे प्रमाण सांभाळा, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या. मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांनी सांगितलेल्या आहारविषयक सूचनांचे पालन करा. अशा छोट्या सवयींमुळे सणाचा आनंद घेत आरोग्याची काळजी घेणेही शक्य होईल.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)