शारदीय नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दिवशी दशमी तिथीला दसरा सण साजरा केला होता. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे प्रतीक म्हणजे दसरा. या वर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी तुमच्या मित्र, मैत्रीण, नातेवाईक व प्रियजनांना द्या या मराठमोळ्या शुभेच्छा...
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
...........
नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची जपू नाती मना मानंची
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
.................
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह,
दसऱ्याच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
..................
आपट्याच्या पानांची होते देवाणघेवाण
प्रेमाचा ओलावा करुनी दान
शुभ दसरा!
..................
दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
....................
वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्म विजयाचा महान सण
विजयादशमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
........................
दुःखाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,
आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
..............................
तुम्ही यशस्वी व्हा,
असो तुमचं भाग्य खास,
तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................................
साडेतीन मुहूर्तापैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
...............................
संकटांना मागे टाकून,
यशाच्या नव्या शिखराकडे तुमचं लक्ष असो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!