संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? ट्राय करा झटपट पोहा कटलेट

नाश्त्यासाठी सोपी आणि लोकप्रिय रेसिपी म्हणजे पोहा कटलेट. ही रेसिपी कमी वेळात तयार होते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? ट्राय करा झटपट पोहा कटलेट
Published on

संध्याकाळी भूक लागली की नेहमी प्रश्न पडतो, आज नाश्त्यासाठी काय बनवायचं? बाहेरचं तेलकट खाण्यापेक्षा घरच्या घरी झटपट, चविष्ट आणि हेल्दी नाश्ता बनवणं नेहमीच चांगलं. म्हणूनच, नाश्त्यासाठी सोपी आणि लोकप्रिय रेसिपी म्हणजे पोहा कटलेट. ही रेसिपी कमी वेळात तयार होते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? ट्राय करा झटपट पोहा कटलेट
Egg Benefits in Winter : हिवाळ्यात अंडी का खावी? जाणून घ्या महत्त्वाचे कारण

साहित्य :

  • जाड पोहे - १ कप (ओले करून पाणी काढलेले)

  • उकडलेले बटाटे - २

  • कांदा - १ बारीक चिरलेला

  • हिरवी मिरची - १ (बारीक चिरलेली)

  • आलं-लसूण पेस्ट - १ टीस्पून

  • धणे - बारीक चिरलेले

  • हळद - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - अर्धा टीस्पून

  • गरम मसाला - अर्धा टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • ब्रेडक्रम्ब्स / रवा - २ टेबलस्पून

  • तेल - तळण्यासाठी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? ट्राय करा झटपट पोहा कटलेट
मध खाल्ल्याने वजन घटतं की वाढतं? जाणून घ्या खरं कारण

कृती :

  • एका मोठ्या भांड्यात ओले पोहे आणि उकडलेले बटाटे एकत्र करून नीट मॅश करा.

  • त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, धणे आणि सर्व मसाले घाला.

  • मिश्रण नीट एकजीव करा. घट्टपणा यावा म्हणून ब्रेडक्रम्ब्स किंवा रवा घाला.

  • या मिश्रणाचे छोटे कटलेट तयार करा.

  • तव्यावर थोडं तेल गरम करून कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? ट्राय करा झटपट पोहा कटलेट
Sev Puri Recipe : संध्याकाळी काहीतरी चटपटीत हवंय? घरीच बनवा शेव पुरी

सर्व्ह करण्याची पद्धत :

गरमागरम पोहा कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. चहाबरोबर हे कटलेट अधिक चविष्ट लागतात.

logo
marathi.freepressjournal.in