गटारी... नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो पोरांचा घोळका, त्यांचा गोंगाट, हातात चिकनचा तुकडा, आणि पाचव्या ग्लासनंतरचा फिलॉसॉफर झालेला मित्र! हा एक दिवस म्हणजे मांसाहाराच्या नावाखाली धमाल, गदारोळ, आणि ‘आपलंपण’ अनुभवण्याचा उत्सव!
या दिवशी तुम्ही देखील WhatsApp Status, Facebook Messages द्वारा आपल्या मित्र-परिवारास गटारीच्या हटके आणि मजेशीर शुभेच्छा पाठवू शकता.
>संपली केव्हाच आषाढीची वारी
नंतर आहे गणपतीची बारी
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी
गटारीच्या शुभेच्छा!
..........................
>ग - गम्मत म्हणून
टा - टाईट होण्याची
री - रीत
गटारीच्या खूप खूप शुभेच्छा!
..........................
>आली आली गटारी
बायको डोळे वटारी.
गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
..........................
>मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या
गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
..........................
>सुकी मच्छी, मटणाचा रस्सा
सगळं घेऊन यंदा घरीच बसा
गटारीच्या तुम्हालाखूप खूप शुभेच्छा!
..........................
>कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,
मच्छीची आमटी नी बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत…
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
..........................
>ओकू नका मातु नका
मटणावर ताव मारू नका
फुकट मिळतेय म्हणून ढोसू नका
झिंगून गटारात लोळू नका
गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)