नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ

ओट्स, रवा, दही आणि मिश्र भाज्यांपासून तयार होणारा हा मऊ, स्पंजी ढोकळा चवदार तर आहेच, शिवाय पौष्टिकही आहे.
नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ
नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक बनवायचे असेल, तर ओट्स आणि व्हेजिटेबल ढोकळा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ओट्स, रवा, दही आणि मिश्र भाज्यांपासून तयार होणारा हा मऊ, स्पंजी ढोकळा चवदार तर आहेच, शिवाय पौष्टिकही आहे. अवघ्या २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य :

  • १/२ कप ओट्सची पावडर

  • १/२ कप दही

  • १/२ कप रवा

  • १/२ टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट

  • १/२ कप उकडलेल्या मिश्र भाज्या (मटार, फ्रेंच बीन्स, गाजर)

  • चवीनुसार मीठ

  • १ टेबलस्पून इनो फ्रूट सॉल्ट

  • सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

  • लाल तिखट (सजावटीसाठी)

  • ताटाला लावण्यासाठी थोडे तेल

नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला ब्रेड टोस्ट; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल

कृती :

एका भांड्यात ओट्सची पावडर, रवा, दही, आले-मिरची पेस्ट, उकडलेल्या भाज्या आणि मीठ घालून चांगले एकजीव करा. शेवटी इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हाताने मिसळा. मिश्रण फेसाळू लागल्यावर लगेच पुढील प्रक्रिया करा. एका ताटाला किंवा ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करा. तयार मिश्रण ताटात ओता आणि हलकेच हलवून समान पसरवा. वरून चिरलेली कोथिंबीर आणि थोडे लाल तिखट भुरभुरा.

स्टीमरमध्ये ८ ते ९ मिनिटे वाफेवर शिजवा. ढोकळा पूर्णपणे शिजल्याची खात्री करून बाहेर काढा. थोडा गार झाल्यावर चौकोनी तुकडे करा आणि हिरव्या कोथिंबिरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक ओट्स-व्हेजिटेबल ढोकळा; चव आणि आरोग्याचा परफेक्ट मेळ
सकाळच्या घाईत पौष्टिक नाश्ता हवा? बनवा प्रोटीनयुक्त टोमॅटो सँडविच

टिप्स :

  • ओट्स आधी मिक्सरमध्ये बारीक करूनच वापरा.

  • इनो घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवू नका; लगेच वाफवण्यासाठी ठेवा.

  • आवडीनुसार ढोकळ्यात ढोबळी मिरची, मक्याचे दाणे किंवा पालकही घालू शकता.

  • ढोकळा अधिक मऊ आणि स्पंजी होण्यासाठी मिश्रण हलक्या हातानेच मिसळा.

  • हिरव्या चटणीसोबत किंवा गोड-तिखट चिंचेच्या चटणीसोबत हा ढोकळा अधिक स्वादिष्ट लागतो.

logo
marathi.freepressjournal.in