Holi Special : बाहेरचं विसरा! क्रीमी आणि सुगंधी केसर श्रीखंड घरच्या घरी बनवा; पाहुणेही विचारतील रेसिपी

होळी म्हणजे रंग, जल्लोष आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी. धुलीवंदनाच्या दिवशी जेवणाच्या ताटात श्रीखंड असलं की सणाची मजाच काही वेगळी असते.
Holi Special : बाहेरचं विसरा! क्रीमी आणि सुगंधी केसर श्रीखंड घरच्या घरी बनवा; पाहुणेही विचारतील रेसिपी
Holi Special : बाहेरचं विसरा! क्रीमी आणि सुगंधी केसर श्रीखंड घरच्या घरी बनवा; पाहुणेही विचारतील रेसिपी
Published on

होळी म्हणजे रंग, जल्लोष आणि गोडधोड पदार्थांची मेजवानी. धुलीवंदनाच्या दिवशी जेवणाच्या ताटात श्रीखंड असलं की सणाची मजाच काही वेगळी असते. त्यातही केसराचा सुगंध आणि वेलचीची हलकीशी चव असलेलं केसर श्रीखंड पाहुण्यांनाही नक्कीच आवडेल. बाजारातून आणण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे श्रीखंड तयार करता येतं.

साहित्य

  • २ कप चक्का

  • १ कप पिठीसाखर

  • ८-१० केसर काड्या

  • २ टेबलस्पून कोमट दूध

  • १/२ टीस्पून वेलची पूड

  • ८-१० बदाम काप

  • ८-१० पिस्ते काप

Holi Special : बाहेरचं विसरा! क्रीमी आणि सुगंधी केसर श्रीखंड घरच्या घरी बनवा; पाहुणेही विचारतील रेसिपी
Holi Special : लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी; या पद्धतीने केलात तर बिघडणार नाही बेत

कृती

सर्वप्रथम दही स्वच्छ मलमलच्या कापडात बांधून ६-७ तास ठेवा, जेणेकरून त्यातील पाणी पूर्ण निघून जाईल आणि घट्ट चक्का तयार होईल.

कोमट दुधात केसर काड्या घालून १० मिनिटे भिजू द्या.

तयार चक्क्यात पिठीसाखर घालून मिश्रण चांगले फेटून गुळगुळीत करा. त्यात केसराचं दूध आणि वेलची पूड घालून पुन्हा एकजीव करा.

शेवटी बदाम-पिस्त्याचे काप मिसळा.

तयार श्रीखंड किमान १–२ तास फ्रिजमध्ये ठेवून थंड सर्व्ह करा.

Holi Special : बाहेरचं विसरा! क्रीमी आणि सुगंधी केसर श्रीखंड घरच्या घरी बनवा; पाहुणेही विचारतील रेसिपी
Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय

टिप्स

  • दही जितकं घट्ट, तितकं श्रीखंड अधिक क्रीमी बनेल.

  • साखरेचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे कमी-जास्त करू शकता.

  • अधिक रिच फ्लेवरसाठी चिमूटभर जायफळ पूड घालू शकता.

  • कृत्रिम रंग टाळून नैसर्गिक केसराचाच वापर करा.

या होळीला घरगुती केसर श्रीखंडासोबत सणाची गोड सुरुवात करा.

logo
marathi.freepressjournal.in