Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय

DIY Holi Colours : घरच्या घरी तयार केलेले रंग केवळ सुरक्षितच नाहीत, तर खर्चही कमी येतो आणि त्वचेचीही काळजी घेतात.
Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय
Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

रंगांचा सण रंगपंचमी जवळ आली की विविध रंगांनी बाजारपेठा बहरतात. पण त्या रंगीबेरंगी पावडरमागे लपलेली केमिकल्स अनेकदा आपल्या त्वचा आणि केसांसाठी घातक ठरतात. यंदा मात्र थोडा बदल करूया. स्वयंपाकघरातील साध्या पदार्थांपासूनच नैसर्गिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंग तयार करून होळी अधिक आनंददायी साजरी करता येईल.

घरच्या घरी तयार केलेले रंग केवळ सुरक्षितच नाहीत, तर खर्चही कमी येतो आणि त्वचेचीही काळजी घेतात.

का टाळावेत केमिकल रंग?

बाजारात मिळणाऱ्या रंगांमध्ये लीड ऑक्साईड, क्रोमियम, कॉपर सल्फेटसारखी हानिकारक रसायने असू शकतात. यामुळे त्वचेवर पुरळ, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ किंवा केस गळण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक पर्याय अधिक योग्य ठरतो.

Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय
केस गळतीवर नैसर्गिक उपाय; जास्वंद-डिंक कंडिशनरने मिळवा शायनी केस

लाल रंग

लाल जास्वंदाची फुले सुकवून त्याची पावडर तयार करा आणि थोड्या पिठात मिसळा.
तसेच बीटरूट किंवा गाजर उकळूनही आकर्षक लाल रंग मिळवता येतो.

गुलाबी रंग

गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळून त्याचा अर्क काढा. त्या पाण्यात आरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर मिसळून वाळवून घ्या. तयार होईल सौम्य गुलाबी रंग. हा रंग त्वचेला मऊ स्पर्श देतो.

पिवळा रंग

हळद आणि बेसन एकत्र करून सुक्या स्वरूपात पिवळा रंग तयार करता येतो. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात.
ओला रंग हवा असल्यास झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या पाण्यात उकळा. त्यातून सुंदर पिवळा रंग मिळतो.

Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय
तुमची जुनी साडी फेकू नका! प्रियदर्शिनी इंदलकरप्रमाणे द्या तिला मॉडर्न ट्विस्ट

नारिंगी रंग

झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून गाळा. त्यात कॉर्नफ्लॉवर घालून सुकवा. यामुळे तेजस्वी नारिंगी रंग तयार होतो.

ब्राऊन रंग

कॉफी पावडर किंवा चहा पावडर पाण्यात उकळा. तयार द्रव कॉर्नफ्लॉवरमध्ये मिसळून वाळवा. मुलतानी मातीचा वापर करूनही हलका ब्राऊन रंग मिळू शकतो.

हिरवा रंग

पालक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि वाळवा. तयार होईल नैसर्गिक हिरवा रंग.

Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय
केस आणि त्वचेसाठी उत्तम! भरपूर Vitamin C ने घरगुती आवळा कँडी रेसिपी; कमी साहित्य, जास्त फायदे

नैसर्गिक रंग वापरल्याने त्वचा, केस आणि पर्यावरण तिन्ही सुरक्षित राहतात. यंदाची होळी केवळ रंगांची नाही, तर आरोग्याचीही असू द्या. घरच्याघरी बनवलेले रंग वापरून आनंदात आणि निर्धास्तपणे सण साजरा करा.

logo
marathi.freepressjournal.in