मटारच्या साली फेकू नका! घरच्या घरी बनवा नैसर्गिक लिक्विड खत, रोपं होतील टवटवीत आणि हिरवीगार

मटारच्या साली कचरा समजून फेकून देऊ नका! त्यापासून झाडांसाठी पोषक लिक्विड खत घरच्या घरी कसे तयार करायचे, याची सोपी पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
मटारच्या साली फेकू नका! घरच्या घरी बनवा नैसर्गिक लिक्विड खत, रोपं होतील टवटवीत आणि हिरवीगार
मटारच्या साली फेकू नका! घरच्या घरी बनवा नैसर्गिक लिक्विड खत, रोपं होतील टवटवीत आणि हिरवीगार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे अनेक पदार्थ आपण कचरा समजून फेकून देतो. पण याच उरलेल्या वस्तू झाडांसाठी उत्तम खत ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नसतं. घराघरांत मोठ्या प्रमाणात वापरला जाणाऱ्या मटारचे दाणे काढल्यानंतर शेंगांच्या साली सरळ कचर्‍यात जातात. मात्र या सालींपासून तयार होणारं नैसर्गिक खत रोपांसाठी खूप उपयोगी ठरू शकतं.

मटारच्या सालींमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. हे घटक झाडांची वाढ चांगली करतात, मुळांना बळकटी देतात आणि फुलझाडांना अधिक कळ्या येण्यास मदत करतात. त्यामुळे घरातील कुंड्यांसाठी हे खत उत्तम पर्याय ठरू शकतं.

मटारच्या साली फेकू नका! घरच्या घरी बनवा नैसर्गिक लिक्विड खत, रोपं होतील टवटवीत आणि हिरवीगार
Home Gardening Tips : पपई खाल्ली की सालं फेकता? थांबा! त्याच सालांपासून तयार करा रोपांसाठी नैसर्गिक खत

कसं तयार कराल मटारच्या सालींचं खत?

१. मटारच्या साली स्वच्छ धुऊन घ्या.
२. त्या छोट्या तुकड्यांत कापा किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
३. एका भांड्यात साली घालून त्यात तीनपट पाणी टाका.
४. भांड्यावर झाकण ठेवा, पण पूर्ण बंद करू नका.
५. हे मिश्रण २४ तास तसेच ठेवा.
६. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या. तयार झालेलं हेच लिक्विड खत.

वापरताना ही पद्धत ठेवा लक्षात

हे खत थेट रोपांना घालू नका. एक भाग खत आणि एक भाग साधं पाणी मिसळून मग झाडांच्या मुळाशी टाका. आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांतून एकदा वापरलं तरी चांगला परिणाम दिसू शकतो.

कोणत्या झाडांना होईल फायदा?

  • गुलाब, जास्वंदसारख्या फुलझाडांना

  • मिरची, टोमॅटो, लिंबू यांसारख्या फळझाडांना

  • घरातील सजावटीच्या हिरव्या रोपांना

मटारच्या साली फेकू नका! घरच्या घरी बनवा नैसर्गिक लिक्विड खत, रोपं होतील टवटवीत आणि हिरवीगार
Kitchen Garden Tips : महागडा लसूण नको! प्लास्टिकच्या बाटलीत घरच्या घरी उगवा ताजा लसूण

फायदे काय?

  • झाडांची वाढ जलद होते

  • पाने तजेलदार दिसतात

  • फुलांची संख्या वाढते

  • मातीची सुपीकता सुधारते

  • खर्चाशिवाय घरच्या घरी खत तयार होतं

म्हणून पुढच्या वेळी मटार सोलल्यानंतर साली फेकण्याऐवजी त्यांचा उपयोग झाडांसाठी करा. छोटासा उपाय तुमच्या बागेचं रूप बदलू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in