कपड्यांचा पसारा होतोय? मग कपाटात कपडे ठेवताना ‘या’ टिप्स वापरा

काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरल्या, तर तुमचं कपाट नेहमी नीटनेटके आणि आकर्षक दिसू शकतं. जाणून घ्या कपाटात कपडे ठेवण्याच्या या उपयुक्त टिप्स…
कपड्यांचा पसारा होतोय? मग कपाटात कपडे ठेवताना ‘या’ टिप्स वापरा
Published on

सकाळी ऑफिसला निघायची घाई, पण कपाट उघडलं की कपड्यांचा पसारा! हवा तो ड्रेस सापडत नाही, नीट ठेवलेले कपडेही विस्कटलेले दिसतात. कितीही मोठं कपाट असलं तरी योग्य पद्धतीने कपडे ठेवले नाहीत, तर गोंधळ उडतोच. मात्र काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरल्या, तर तुमचं कपाट नेहमी नीटनेटके आणि आकर्षक दिसू शकतं. जाणून घ्या कपाटात कपडे ठेवण्याच्या या उपयुक्त टिप्स…

कपड्यांचा पसारा होतोय? मग कपाटात कपडे ठेवताना ‘या’ टिप्स वापरा
थंडीमुळे नेलपेंट घट्ट होतेय? तर 'हे' उपाय नक्की करा

कपाटात कपडे नीट ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स

  • कपड्यांची वर्गवारी करा : रोजचे कपडे, ऑफिस वेअर, पार्टी वेअर, घरचे कपडे अशाप्रकारे कपड्यांची विभागणी करा. यामुळे हवा तो ड्रेस लगेच मिळतो.

  • वापरात नसलेले कपडे बाजूला ठेवा : जे कपडे तुम्ही ६ महिने किंवा वर्षभर घातले नाहीत, ते वेगळ्या बॅगमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवा. यामुळे कपाटात मोकळी जागा मिळते.

  • फोल्डिंगची योग्य पद्धत वापरा : कपड्यांची सरळ आणि एकसारख्या पद्धतीने घडी घाला. उभ्या पद्धतीने (vertical folding) कपडे ठेवल्यास कमी जागेत जास्त कपडे मावतात.

कपड्यांचा पसारा होतोय? मग कपाटात कपडे ठेवताना ‘या’ टिप्स वापरा
हिवाळ्यात कोंडा जास्त का होतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय
  • हँगरचा स्मार्ट वापर करा : शर्ट, साड्या, ड्रेस यासाठी हँगर वापरा. एकाच प्रकारचे हँगर वापरल्यास कपाट अधिक नीटनेटके दिसते.

  • ड्रॉवर ऑर्गनायझरचा वापर करा : अंतर्वस्त्रे, रुमाल, सॉक्स यांसाठी छोटे बॉक्स किंवा ड्रॉवर ऑर्गनायझर वापरा. त्यामुळे पसारा टाळता येतो.

  • सीझननुसार कपडे ठेवा : हिवाळी कपडे उन्हाळ्यात आणि उन्हाळी कपडे हिवाळ्यात वापरात नसतील, तर ते वेगळे पॅक करून ठेवा. यामुळे नेहमीच्या कपड्यांसाठी जास्त जागा मिळते.

  • कपाट आठवड्यातून एकदा आवरा : आठवड्यातून किमान एकदा कपाट आवरण्याची सवय लावा. थोडासा पसाराही लगेच आवरला तर ऐनवेळी गोंधळ होत नाही.

कपड्यांचा पसारा होतोय? मग कपाटात कपडे ठेवताना ‘या’ टिप्स वापरा
हिवाळ्यात कानदुखीचा त्रास वाढतोय? 'या' चुका टाळा मिळेल लगेच आराम

थोडीशी शिस्त आणि योग्य नियोजन असेल, तर कपाट कायम नीटनेटके राहू शकते. या सोप्या टिप्स फॉलो केल्या तर कपड्यांचा पसारा नक्कीच कमी होईल आणि तुमचा वेळही वाचेल.

logo
marathi.freepressjournal.in