Indian Railway Facts : रेल्वेच्या डब्यावरचा 'हा' ५ अंकी नंबर सांगतो बरंच काही; तुम्हाला माहिती आहे का?

ट्रेनच्या डब्यावर लिहिलेला ५ अंकी नंबर फक्त ओळख क्रमांक नाही. त्या नंबरवरून कोचचं वय आणि प्रकार कसा ओळखायचा? जाणून घ्या भारतीय रेल्वेची ही खास माहिती.
Indian Railway Facts : रेल्वेच्या डब्यावरचा 'हा' ५ अंकी नंबर सांगतो बरंच काही; तुम्हाला माहिती आहे का?
Indian Railway Facts : रेल्वेच्या डब्यावरचा 'हा' ५ अंकी नंबर सांगतो बरंच काही; तुम्हाला माहिती आहे का?
Published on

भारतीय रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक डब्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलेला पाच अंकी क्रमांक तुम्ही अनेकदा पाहिला असेल. बहुतेकजण त्याकडे साधा ओळख क्रमांक म्हणून पाहतात. पण हा नंबर फक्त ओळखीसाठी नसून, त्या कोचची महत्त्वाची माहिती सांगणारा एक खास संकेत असतो. एकदा त्याचा अर्थ समजला की, कोणत्याही डब्याबद्दलची माहिती काही सेकंदांत ओळखता येते.

पहिल्या दोन अंकांत दडलंय एक रहस्य

या पाच अंकी क्रमांकातील पहिले दोन अंक त्या कोचची निर्मिती कोणत्या वर्षी झाली, हे सांगतात.

उदाहरणार्थ, एखाद्या डब्यावर १९४८५ असा क्रमांक लिहिला असेल, तर त्यातील '१९' म्हणजे हा डबा २०१९ साली तयार करण्यात आला आहे.

Indian Railway Facts : रेल्वेच्या डब्यावरचा 'हा' ५ अंकी नंबर सांगतो बरंच काही; तुम्हाला माहिती आहे का?
रेल्वे स्टेशनच्या नावातील 'टर्मिनस', 'जंक्शन' आणि 'कॅन्ट'चा अर्थ काय? ९०% लोकांना माहिती नाही!

शेवटचे तीन अंक काय सांगतात?

क्रमांकातील शेवटचे तीन अंक हा कोच नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे दर्शवतात.

  • ००१ ते २०० : वातानुकूलित (AC) कोच

  • २०१ ते ४०० : स्लीपर कोच

  • ४०१ ते ६०० : जनरल कोच

  • ६०१ ते ७०० : चेअर कार

  • ७०१ ते ८०० : बॅगेज किंवा पार्सल कोच

उदाहरणार्थ, १९४८५ या क्रमांकातील ४८५ हा भाग हा जनरल कोच असल्याचं दर्शवतो.

Indian Railway Facts : रेल्वेच्या डब्यावरचा 'हा' ५ अंकी नंबर सांगतो बरंच काही; तुम्हाला माहिती आहे का?
Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

रेल्वेला याची गरज का असते?

भारतीय रेल्वेकडे हजारो कोच आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती, तांत्रिक तपासणी आणि नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येक डब्याला असा स्वतंत्र क्रमांक दिला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कोणताही कोच लगेच ओळखता येतो.

पुढच्या प्रवासात एकदा नक्की पाहा...

पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना आपल्या डब्यावरचा पाच अंकी क्रमांक नीट पाहा. तो फक्त एक नंबर नसून, त्या कोचचा 'बायोडेटा'च आहे.

logo
marathi.freepressjournal.in