इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा

Induction Stove : वीजेवर चालणारा हा स्टोव्ह गॅसच्या तुलनेत सोयीचा आणि काही प्रमाणात सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र, इंडक्शन स्टोव्हच्या बाजारात अनेक प्रकारचे मॉडेल उपलब्ध असल्यामुळे खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक ठरते.
इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
Published on

मध्य पूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी (LPG) पुरवठ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काही नागरिकांना गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती वाटत असल्याने अनेकजण आगाऊ सिलिंडर बुक करून घरात साठवणूक करत असल्याचेही दिसत आहे. या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी गॅसच्या दरांमध्येही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

या परिस्थितीमुळे अनेक नागरिक स्वयंपाकासाठी पर्यायी उपायांचा विचार करत आहेत. त्यामध्ये इंडक्शन स्टोव्हची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वीजेवर चालणारा हा स्टोव्ह गॅसच्या तुलनेत सोयीचा आणि काही प्रमाणात सोयीस्कर पर्याय मानला जातो. मात्र, इंडक्शन स्टोव्हच्या बाजारात अनेक प्रकारचे मॉडेल उपलब्ध असल्यामुळे खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक ठरते.

इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
ठाण्यात व्यावसायिक गॅस पुरवठयावर संक्रांत; हॉटेल व्यावसायिक हवालदिल

पॉवर रेटिंग आणि कुकिंग मोड तपासणे गरजेचे

इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताना सर्वप्रथम त्याची पॉवर रेटिंग पाहणे महत्त्वाचे असते. बाजारात साधारणपणे १२०० वॅट ते २२०० वॅटपर्यंतचे इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध असतात. जास्त पॉवर असलेले मॉडेल पदार्थ लवकर शिजवण्यास मदत करतात. मात्र त्यामुळे विजेचा वापर तुलनेने जास्त होऊ शकतो.

इंडक्शन स्टोव्ह खरेदी करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात

त्यामुळे आपल्या रोजच्या वापरानुसार योग्य पॉवर असलेला इंडक्शन निवडणे महत्त्वाचे ठरते. अनेक आधुनिक मॉडेलमध्ये उकळणे, फ्राय करणे किंवा स्लो कुकिंगसारखे वेगवेगळे कुकिंग मोड दिलेले असतात. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होते आणि वीज वापरावरही नियंत्रण ठेवता येते. इंडक्शन स्टोव्ह खरेदी करण्यापूर्वी आपल्या घरातील वीज कनेक्शन त्या पॉवरसाठी योग्य आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे.

प्रत्येक भांडे इंडक्शनवर चालत नाही

इंडक्शन स्टोव्हची कार्यपद्धती मॅग्नेटिक बेसवर आधारित असते. त्यामुळे सर्व प्रकारची भांडी त्यावर वापरता येत नाहीत. स्टील किंवा आयर्न बेस असलेली भांडी इंडक्शनवर योग्य प्रकारे तापतात.

ॲल्युमिनियम किंवा साधी भांडी अनेकदा इंडक्शनवर काम करत नाहीत. त्यामुळे नवीन इंडक्शन घेण्यापूर्वी आपल्या घरातील भांडी त्यावर वापरता येतील का, हे तपासणे योग्य ठरते. गरज पडल्यास इंडक्शन बेस असलेली भांडी स्वतंत्रपणे घ्यावी लागू शकतात.

सेफ्टी फीचर्स आणि ब्रँडची खात्री करा

सध्याच्या इंडक्शन स्टोव्हमध्ये अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स दिलेले असतात. यात ऑटो कट-ऑफ, ओव्हरहीट प्रोटेक्शन आणि चाइल्ड लॉकसारख्या सुविधा समाविष्ट असतात. इंडक्शन जास्त गरम झाल्यास किंवा त्यावर योग्य भांडे न ठेवल्यास हे उपकरण आपोआप बंद होते.

यामुळे अपघात किंवा धोक्याची शक्यता कमी होते. याशिवाय इंडक्शन खरेदी करताना ब्रँड, वॉरंटी आणि सर्व्हिस सपोर्ट यांची माहितीही तपासणे महत्त्वाचे ठरते. विश्वासार्ह कंपनीचे उपकरण किंमतीने थोडे महाग असले तरी ते दीर्घकाळ टिकणारे असते.

logo
marathi.freepressjournal.in