फणसाच्या आठळ्या फेकू नका! पोषणाचा खजिना ठरू शकतात या बिया; जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत

फणसाचे गरे आवडीने खाल्ले जातात, पण त्यातील बिया म्हणजेच आठळ्या मात्र अनेकदा कचर्‍यात जातात. प्रत्यक्षात या बियांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा भरपूर साठा असतो. पचन, त्वचा, डोळे आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फणसाच्या आठळ्यांचे फायदे जाणून घ्या.
फणसाच्या आठळ्या फेकू नका! पोषणाचा खजिना ठरू शकतात या बिया; जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत
फणसाच्या आठळ्या फेकू नका! पोषणाचा खजिना ठरू शकतात या बिया; जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

फणस म्हटलं की सर्वप्रथम आठवतात त्याचे रसाळ आणि गोड गरे, मात्र फणसाच्या बिया (ज्याला ‘आठळ्या’ असेही म्हणतात) बहुतांश वेळा निरुपयोगी समजून फेकून दिल्या जातात. मात्र या छोट्याशा बियांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त पोषक घटकांचा मोठा साठा दडलेला असतो.

फणसाच्या आठळ्यांमध्ये व्हिटॅमिन ‘अ’, व्हिटॅमिन ‘क’, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. याशिवाय बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, थायमिन आणि रायबोफ्लेविनही त्यात असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.

फणसाच्या आठळ्या फेकू नका! पोषणाचा खजिना ठरू शकतात या बिया; जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत
ढोकळा खाणाऱ्यांनी एकदा हे नक्की वाचा; शरीरावर होतो असा परिणाम

आहारात कशा समाविष्ट कराल?

फणसाच्या आठळ्या खाण्याचे अनेक सोपे पर्याय आहेत. त्या उकडून खाऊ शकता, भाजून स्नॅक्सप्रमाणे खाऊ शकता किंवा त्यांची भाजीही बनवता येते. काही ठिकाणी या बियांची पावडर करून लाडू किंवा इतर पदार्थांमध्येही वापर केली जाते. योग्य प्रकारे शिजवल्यानंतर त्यांची चवही रुचकर लागते.

पचनासाठी फायदेशीर

आठळ्यांमधील फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो.

वजन नियंत्रणात मदत

फायबरयुक्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

फणसाच्या आठळ्या फेकू नका! पोषणाचा खजिना ठरू शकतात या बिया; जाणून घ्या फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत
Health Tips : सकाळी उपाशीपोटी भिजवलेलं अंजीर खा; थकवा, कमजोरी आणि पचनाच्या तक्रारींपासून मिळेल आराम

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

फणसाच्या आठळ्यांतील काही घटक कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो.

त्वचा आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी लाभदायी

व्हिटॅमिन ‘क’ आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही हे पोषक घटक उपयुक्त ठरतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

आठळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन ‘अ’ डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत करते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास दृष्टीसाठी आवश्यक पोषण मिळू शकते.

फणस खाल्ल्यानंतर आठळ्या फेकून देण्याऐवजी त्या आहारात योग्य पद्धतीने समाविष्ट केल्यास चव आणि पोषणमूल्य दोन्ही मिळू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी फणस खरेदी केल्यावर त्याच्या आठळ्यांकडे दुर्लक्ष करू नका.

logo
marathi.freepressjournal.in