चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक

चेहरा डल दिसत असेल तर घरच्या घरी कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल. फक्त ४ सोप्या स्टेप्समध्ये मिळवा फ्रेश आणि ग्लोइंग लूक.
चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक
चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

चेहरा सतत डल आणि थकलेला दिसतोय? त्यासाठी लगेच पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरातच उपलब्ध असलेल्या काही साध्या पदार्थांच्या मदतीने तुम्ही मिल्क फेशियल करू शकता. कच्चं दूध, तांदळाचं पीठ, ॲलोव्हेरा जेल आणि बेसन वापरून हे फेशियल अगदी सोप्या पद्धतीने करता येतं.

फक्त ४ स्टेप्समध्ये हे फेशियल पूर्ण करता येतं आणि त्यासाठी साधारण २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र, त्वचेला कोणतीही ॲलर्जी किंवा संवेदनशीलता असल्यास हा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं योग्य ठरेल.

मिल्क फेशियल करण्याची पहिली स्टेप; चेहरा करा क्लीन

सर्वात आधी चेहऱ्यावरची धूळ आणि मळ स्वच्छ करा. यासाठी अर्धी वाटी कच्चं दूध घ्या आणि त्यात अगदी चिमूटभर हळद मिसळा. कापूस या मिश्रणात बुडवून हलक्या हाताने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा.

चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक
बाजारातील महागडे शीट मास्क नकोत! टिश्यू पेपरपासून घरीच बनवा ग्लोइंग फेस मास्क

दुसऱ्या स्टेपमध्ये करा हलकं स्क्रबिंग

यानंतर चेहऱ्यावर साचलेली डेड स्किन काढण्यासाठी हलकं स्क्रबिंग करता येईल. एका वाटीत कच्चं दूध आणि तांदळाचं पीठ घेऊन मऊसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून बोटांच्या टोकांनी अगदी हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. त्वचेवर जोरात घासणं टाळा.

तिसऱ्या स्टेपमध्ये करा ॲलोव्हेरा जेलने मसाज

आता त्वचेला मॉइश्चरायझिंग टच देण्यासाठी २ चमचे ॲलोव्हेरा जेलमध्ये १ चमचा कच्चं दूध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक
Hair Care : केस गळत असतील तर रोज नवा उपाय नको; आधी 'या' चुका थांबवा
चेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक
पायांची सूज, थकवा आणि ताण कमी करण्यासाठी ट्राय करा 'कोल्ड बॉटल मसाज'

शेवटी लावा घरगुती फेसपॅक

फेशियलच्या शेवटच्या स्टेपमध्ये १ चमचा बेसन आणि १ चमचा गव्हाचं पीठ घ्या. त्यात आवश्यकतेनुसार कच्चं दूध घालून मध्यम घट्टपणाचा लेप तयार करा. हा लेप चेहऱ्यावर समान पसरवा आणि साधारण १० मिनिटे ठेवून द्या. पूर्णपणे ताणून सुकण्याआधी हलक्या हाताने काढा आणि चेहरा पाण्याने धुवा.

शेवटी त्वचेला सूट होणारं मॉइश्चरायझर लावा. नियमित स्किन केअरसोबत ही प्रक्रिया केल्यास त्वचा स्वच्छ आणि मऊ वाटण्यास मदत होऊ शकते. संवेदनशील त्वचा, ॲलर्जी किंवा त्वचेचा त्रास असल्यास हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

logo
marathi.freepressjournal.in