मुले कंटाळली रोजच्या भाज्यांना? मग ही ‘मशरूम बटर मसाला’ डिश त्यांची फेवरेट ठरेल!

'मशरूम बटर मसाला' ही अशी एक खास डिश आहे जी बनवायला सोपी, दिसायला रेस्टॉरंटसारखी आणि चवीला अप्रतिम आहे. बटर, मसाले आणि क्रीमचा परफेक्ट संगम असलेली ही रेसिपी मुलांची नवी फेवरेट ठरल्याशिवाय राहणार नाही!
मुले कंटाळली रोजच्या भाज्यांना? मग ही ‘मशरूम बटर मसाला’ डिश त्यांची फेवरेट ठरेल!
मुले कंटाळली रोजच्या भाज्यांना? मग ही ‘मशरूम बटर मसाला’ डिश त्यांची फेवरेट ठरेल!कॅनव्हा
Published on

कृतीमुले रोजच्या भाज्यांकडे पाहून नाक मुरडतात, तेव्हा आईंच्या मनातला पहिला प्रश्न - "आज जेवणात काय बनवू?" अशा वेळी काहीतरी चविष्ट, पण झटपट तयार होणारं बनवलं, तर सगळेच खूश! 'मशरूम बटर मसाला' ही अशीच एक खास डिश आहे जी बनवायला सोपी, दिसायला रेस्टॉरंटसारखी आणि चवीला अप्रतिम आहे. बटर, मसाले आणि क्रीमचा परफेक्ट संगम असलेली ही रेसिपी मुलांची नवी फेवरेट ठरल्याशिवाय राहणार नाही!

मुले कंटाळली रोजच्या भाज्यांना? मग ही ‘मशरूम बटर मसाला’ डिश त्यांची फेवरेट ठरेल!
सर्दी-खोकला होईल झटकन दूर! प्या मस्त गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप

साहित्य

  • मशरूम - २०० ग्रॅम (स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावेत)

  • कांदा - १ (उभा चिरलेला)

  • टोमॅटो - १ (चिरलेला)

  • काजू - १०

  • बटर - २ चमचे

  • आलं-लसूण पेस्ट - १ चमचा

  • काश्मिरी लाल तिखट - १ चमचा

  • हळद - १ चमचा

  • जीरे - १ चमचा

  • तमालपत्र – १

  • दालचिनीचा तुकडा - १

  • मीठ - चवीनुसार

  • काळीमिरी पावडर - १ चमचा

  • गरम मसाला - १ चमचा

  • कसूरी मेथी - १ चमचा

  • क्रीम - १ चमचा

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

मुले कंटाळली रोजच्या भाज्यांना? मग ही ‘मशरूम बटर मसाला’ डिश त्यांची फेवरेट ठरेल!
नाश्त्यासाठी काही नवीन ट्राय करायचंय? बनवा 'मसाला टिक्की पाव', पाहून मुलं म्हणतील - व्वा आई!

कृती

मशरूममध्ये तिखट, काळीमिरी आणि मीठ घालून काही मिनिटं मुरवून ठेवा. पॅनमध्ये थोडं तेल गरम करून मशरूम पाच मिनिटं परतून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये जीरे टाकून फोडणी करा, त्यात कांदा, टोमॅटो आणि काजू घालून मऊ शिजेपर्यंत परता व थंड झाल्यावर पेस्ट करा. यानंतर त्याच पॅनमध्ये बटर गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी आणि तयार केलेली पेस्ट घाला. लाल तिखट, हळद, मीठ घालून काही मिनिटं शिजवा. मग त्यात फ्राय मशरूम, कसूरी मेथी, गरम मसाला आणि क्रीम घालून नीट मिक्स करा. १० मिनिटं मंद आचेवर शिजू द्या, वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम ‘मशरूम बटर मसाला’ नान किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in