Navratri 2026 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी

Navratri 2026 Colours: शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा? जाणून घ्या ११ ते १९ ऑक्टोबरपर्यंतच्या नऊ दिवसांची रंगांची संपूर्ण यादी.
Navratri 2026 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी
Navratri 2026 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

गणेशोत्सवानंतर आता भाविकांना वेध लागले आहेत ते शारदीय नवरात्रोत्सवाचे. पितृपक्ष संपल्यानंतर देवीच्या आगमनाने नवरात्रीला सुरुवात होते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा, गरबा-दांडिया आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण उत्साहाने भरून जाते.

नवरात्री म्हटलं की देवीची आराधना आणि गरबा-दांडियासोबतच चर्चेत असतात ते नऊ दिवसांचे नऊ रंग. ऑफिस, कॉलेज, शाळा, महिला ग्रुप किंवा गरबा मंडळांमध्ये ठरलेल्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे, याची यादी अनेकजण आधीच शोधत आहेत. चला तर मग, पाहूया यंदाचे नऊ रंग...

Navratri 2026 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी
सणवारांना नटताना स्किनटोननुसार कपड्यांची निवड कशी कराल? जाणून घ्या

कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा?

११ ऑक्टोबर २०२६, रविवार - नारंगी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नारंगी रंगाने उत्सवाची सुरुवात होईल.

१२ ऑक्टोबर २०२६, सोमवार - पांढरा
दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाची निवड करता येईल.

१३ ऑक्टोबर २०२६, मंगळवार - लाल
तिसऱ्या दिवशी लाल रंग परिधान केला जाईल.

१४ ऑक्टोबर २०२६, बुधवार - रॉयल ब्लू
चौथ्या दिवशी रॉयल ब्लू रंगाचा पर्याय आहे.

१५ ऑक्टोबर २०२६, गुरुवार - पिवळा
पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाची रंगत पाहायला मिळेल.

१६ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार - हिरवा
सहाव्या दिवशी हिरवा रंग परिधान करता येईल.

१७ ऑक्टोबर २०२६, शनिवार - राखाडी
सातव्या दिवशी राखाडी रंगाचा ड्रेस कोड असेल.

१८ ऑक्टोबर २०२६, रविवार - जांभळा
आठव्या दिवशी जांभळ्या रंगाची निवड केली जाते.

Navratri 2026 : यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी
केळी खाऊन साल फेकू नका! 'असा' तयार करा फेसमास्क, त्वचा दिसेल अधिक टाईट आणि ग्लोइंग

१९ ऑक्टोबर २०२६, सोमवार – मोरपंखी हिरवा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी मोरपंखी हिरवा रंग आहे.

नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घालतात?

नवरात्रीच्या नऊ दिवसांत वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. देवीच्या विविध रूपांशी रंग जोडले जात असल्याची मान्यता आहे. त्यामुळे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत अनेक ठिकाणी पाळली जाते.

मात्र, नवरात्रीत हे नऊ रंगांचे कपडे घालणे बंधनकारक नाही. ही प्रामुख्याने परंपरा आणि आवडीचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला आवडेल त्या रंगाचा पोशाख परिधान करून नवरात्रीचा उत्साह साजरा करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in