PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे

PCOS चा त्रास असलेल्या महिलांनी नाश्त्यात काय खावं, जाणून घ्या.
PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे
PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

सकाळची ऑफिसला जाण्याची घाई, घरातील कामं आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक महिला नाश्त्यासाठी पटकन तयार होणारे पदार्थ निवडतात. पोहे, उपमा, ब्रेड किंवा फळांचा रस हे पर्याय अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतात. मात्र, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS चा त्रास असेल, तर नाश्त्यात नेमकं काय खातोय, याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

PCOS ही महिलांच्या हार्मोन्सशी संबंधित समस्या आहे. यामध्ये मासिक पाळी अनियमित होणं, चेहऱ्यावर मुरुम येणं, अनावश्यक केस वाढणं किंवा डोक्यावरील केस पातळ होणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही महिलांचं वजन वाढतं, तर काहींचं वजन सामान्य असूनही त्यांना PCOS असू शकतो.

PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे
Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...

या समस्येचा इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंध असू शकतो. त्यामुळे नाश्त्यात केवळ कर्बोदकं न घेता प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी चरबी यांचा समतोल राखणं फायदेशीर ठरू शकतं.

१. बेसन किंवा ओट्सचा चिला

रोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल, तर भाज्या घालून बेसनाचा चिला बनवू शकता. बेसनातून प्रथिने आणि फायबर मिळतात. त्यात पालक, कांदा, टोमॅटो किंवा मेथी घातल्यास नाश्ता अधिक पौष्टिक होतो.

ओट्सचा चिलाही चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, ओट्ससोबत दही, पनीर किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास नाश्ता अधिक संतुलित होईल.

२. अंड्याची भुर्जी आणि मल्टीग्रेन टोस्ट

अंडी खात असाल, तर सकाळच्या नाश्त्यात अंड्याची भुर्जी किंवा उकडलेली अंडी घेऊ शकता. अंड्यांमधून चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. त्यासोबत भाज्या आणि संपूर्ण धान्यांपासून बनवलेला टोस्ट घेतल्यास पोट अधिक वेळ भरलेलं राहण्यास मदत होऊ शकते.

शाकाहारी महिलांसाठी पनीर भुर्जी किंवा टोफू हेदेखील पर्याय आहेत.

PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे
Skin Care : उन्हामुळे टॅनिंग झालंय? घरच्या घरी असा तयार करा मसूर डाळीचा स्क्रब, त्वचा दिसेल तजेलदार

३. मुगाच्या डाळीचा डोसा किंवा इडली

नेहमीच्या डोशाऐवजी मुगाच्या डाळीचा डोसा करून पाहा. मुगाच्या डाळीत प्रथिने आणि फायबर असतात. त्यामुळे हा पदार्थ नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय ठरू शकतो.

मुगाच्या डाळीची इडलीही बनवता येते. त्यासोबत सांबार किंवा कमी तेलातील चटणी घेतल्यास नाश्ता अधिक संतुलित होईल.

नाश्ता करताना 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा

प्रथिनांकडे दुर्लक्ष करू नका : नाश्त्यात अंडी, पनीर, दही, डाळी किंवा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. प्रथिनांमुळे पोट भरलेलं राहण्यास मदत होते.

गोड पेयं आणि पॅकेज्ड पदार्थ मर्यादित ठेवा : साखर घातलेले ज्यूस, गोड कॉर्नफ्लेक्स आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार खाणं टाळा. फळांच्या रसाऐवजी संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

आरोग्यदायी चरबीचाही समावेश करा : बदाम, अक्रोड, जवस किंवा भोपळ्याच्या बिया मर्यादित प्रमाणात नाश्त्यात घेऊ शकता. त्यातून उपयुक्त पोषक घटक मिळतात.

PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे
ब्लड शुगर वाढतेय? मग आजच बदला रात्रीच्या 'या' ५ सवयी

मग पोहे आणि उपमा पूर्णपणे बंद करायचे का?

PCOS आहे म्हणून पोहे, उपमा किंवा नेहमीची इडली पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. हे पदार्थ किती प्रमाणात खाता आणि त्यासोबत काय घेता, हे अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, पोह्यांमध्ये भाज्या आणि शेंगदाणे घालणं किंवा उपम्यासोबत दही घेणं हेही संतुलित नाश्त्याचे पर्याय ठरू शकतात.

महत्त्वाचं म्हणजे, PCOS नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ नाश्ता बदलणं पुरेसं नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि डॉक्टरांनी सुचवलेले उपचार यांचीही गरज असते.

(डिस्क्लेमर : ही माहिती इंटरनेटवरील उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. 'नवशक्ति' याच्या अचूकतेची हमी देत नाही. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

logo
marathi.freepressjournal.in