पाहुणे आलेत? कुकरमध्ये झटपट बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत पावभाजी, फक्त १५ मिनिटांत!

पावभाजी घरी बनवायचं म्हटलं की खूपच किचकट काम वाटतं. पण जर तुम्ही कुकरचा वापर केला, तर घरच्या साध्या साहित्यापासूनही फक्त १०-१५ मिनिटांत मऊ, लालसर आणि रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार करता येते. चला तर मग पाहूया, अचानक पाहुणे आले तरी झटपट आणि चविष्ट पावभाजी कशी बनवता येईल.
पाहुणे आलेत? कुकरमध्ये झटपट बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत पावभाजी, फक्त १५ मिनिटांत!
पाहुणे आलेत? कुकरमध्ये झटपट बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत पावभाजी, फक्त १५ मिनिटांत!
Published on

कधी कधी अचानक पाहुणे येतात आणि लगेच जेवण तयार करायचं असतं. पावभाजी घरी बनवायचं म्हटलं की खूपच किचकट काम वाटतं आणि वेळ खूप जातो. त्यामुळे बरेच लोक घरी बनवण्याऐवजी बाहेरून पावभाजी आणणं पसंत करतात. पण जर तुम्ही कुकरचा वापर केला, तर घरच्या साध्या साहित्यापासूनही फक्त १०-१५ मिनिटांत मऊ, लालसर आणि रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार करता येते. चला तर मग पाहूया, अचानक पाहुणे आले तरी झटपट आणि चविष्ट पावभाजी कशी बनवता येईल.

पाहुणे आलेत? कुकरमध्ये झटपट बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत पावभाजी, फक्त १५ मिनिटांत!
कडू कारलं न खाणारे देखील आवडीने खातील; बनवा 'ही' स्पेशल रेसिपी!

साहित्य :

  • बटाटे - ३ मध्यम (क्युबमध्ये कापलेले)

  • फ्लॉवर - १ मध्यम (फुलं करून)

  • गाजर - २ मध्यम (चिरलेले)

  • मटार - १/२ कप

  • कांदा - २ मध्यम (चिरलेले)

  • टोमॅटो - ३ मोठे (चिरलेले)

  • हिरवी मिरची - २-३

  • आले–लसूण पेस्ट - १ चमचा

  • पावभाजी मसाला - २ चमचे

  • तूप/तेल - २-३ चमचे

  • मीठ – चवीनुसार

  • पाणी - १ कप

  • थोडा बिटाचा तुकडा - लालसर रंगासाठी (ऐच्छिक)

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती :

सर्वप्रथम बटाटे, फ्लॉवर आणि गाजर मध्यम आकारात कापून घ्या. लहान तुकडे असल्यास भाज्या लवकर शिजतात आणि मॅश करायला सोपे पडतात. नंतर सर्व भाज्या, मटार, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, पावभाजी मसाला आणि मीठ कुकरमध्ये घाला. १ कप कोमट पाणी टाकून कुकरची एक सिटी येईपर्यंत शिजवा.

कुकरची वाफ गेल्यानंतर गरम भाज्या पोटॅटो मॅशरने मॅश करा. गरम असताना मॅश केल्यास भाजी मऊ आणि एकसंध होते. जर हॉटेलसारखा लालसर रंग हवा असेल, तर थोडासा बिटाचा तुकडा भाज्यांसोबत शिजवताना टाका. भाजी घट्ट वाटल्यास थोडे गरम पाणी घालून एक उकळी आणा; कधीही थंड पाणी वरून घालू नका, त्यामुळे चव बिघडते.

पाहुणे आलेत? कुकरमध्ये झटपट बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत पावभाजी, फक्त १५ मिनिटांत!
जेवणात चार घास जास्तच जातील; झटपट बनवा 'हे' मिक्स भाज्यांचे आंबटगोड लोणचं

भाजी शिजत असताना दुसऱ्या बाजूला पाव बटर/तेल लावून तव्यावर गरम करा. सर्व काही तयार झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम पावभाजी सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in