फक्त काहीच सेकंदांत लॉक रीसेट! प्रवासात सुटकेस लॉक विसरणाऱ्यांसाठी भन्नाट हॅक

तुम्ही नवीन सुटकेस घेतली असेल आणि त्यावर डिफॉल्ट 000 असेल, तर सर्वात आधी हा कोड बदलणे महत्त्वाचे असते.
फक्त काहीच सेकंदांत लॉक रीसेट! प्रवासात सुटकेस लॉक विसरणाऱ्यांसाठी भन्नाट हॅक
फक्त काहीच सेकंदांत लॉक रीसेट! प्रवासात सुटकेस लॉक विसरणाऱ्यांसाठी भन्नाट हॅक
Published on

तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? तुम्ही कुठेतरी फिरायला गेले आहात… सगळं काही मस्त सुरू आहे… पण जेव्हा सुटकेस उघडायची वेळ येते, तेव्हा नेमका लॉकचा कोडच आठवत नाही! त्या क्षणी किती पॅनिक व्हायला होतं ना.. सोबतची सगळी माणसं ट्रीप एन्जॉय करतायत, आणि आपण मात्र तेच तीन नंबर फिरवत बसलेले असता. जर तुम्हीही या बाबतीत विसारभोळे असाल तर तर काळजी नको. आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक छोटासा पण भन्नाट हॅक ज्यामुळे, हा सारा त्रास अक्षरशः काही सेकंदांत गायब होऊ शकतो.

नवीन बॅगेचा कोड बदलण्याची सर्वात सोपी पद्धत

तुम्ही नवीन सुटकेस घेतली असेल आणि त्यावर डिफॉल्ट 000 असेल, तर सर्वात आधी हा कोड बदलणे महत्त्वाचे असते.

फक्त काहीच सेकंदांत लॉक रीसेट! प्रवासात सुटकेस लॉक विसरणाऱ्यांसाठी भन्नाट हॅक
Solar Eclipse : तब्बल १०० वर्षांनी होणार दिवसा अंधार! ६ मिनिटांचं महाकाय सूर्यग्रहण जग पाहणार

तुमच्या लॉकची रचना समजून घ्या

  • बहुतांश लगेज लॉकमध्ये एक रीसेट मोड असतो.

  • झिप पुलरच्या आत किंवा लॉकच्या बाजूला एक लहान बटण किंवा स्लायडिंग लीव्हर असतो.

  • सेमसोनाइट, व्हीआयपी, स्विस मिलिटरी, अमेरिकन टूरिस्टर—बहुतेक ब्रँड्समध्ये रीसेटची प्रक्रिया सारखीच असते.

  • रीसेट बटण दाबण्यासाठी पेन, पेपरक्लिप किंवा पेन्सिल सारख्या साध्या टूलचा वापर करू शकता.

नवीन सुटकेस 000 ला सेट असते, त्यामुळे स्वतःचा कोड सेट करणे अगदी सोपं.

नवीन कोड कसा सेट करायचा?

  • जर सध्याचा कोड माहिती असेल (किंवा 000 असेल), तर हे करा:

  • सध्याचा कोड लावून लॉक उघडा.

  • लॉकजवळचे लहान रीसेट बटण शोधा आणि पेनने दाबा. ते क्लिक झालं की रीसेट मोड सुरू.

  • बटण दाबलेलंच ठेवून तुमचा नवीन ३-अंकी कोड सेट करा. (उदा. 4-1-8)

  • बटण सोडा किंवा लीव्हर परत नेहमीच्या जागी आणा.

  • डायल्स गोंधळवून पुन्हा नवीन कोड टाकून चाचणी करा. लॉक नीट उघडत-बंद होतंय ना ते बघा.

कोड पूर्ण विसरला? मग काय कराल?

१) ब्रूट फोर्स पद्धत

000 ते 999 असे 1000 कॉम्बिनेशन असतात.

लोक म्हणतात १५–२० मिनिटांत होतं… पण प्रत्यक्षात दोन तासही लागू शकतात!

वेळ असेल तरच ही पद्धत वापरा .

२) ‘फील मेथड’ - सर्वात सोपी आणि स्मार्ट पद्धत

थोडा जोर देऊन लॉकचा शॅकल (किंवा झिप) ताणून धरा.

पहिलं चाक फिरवत रहा, आणि ज्या ठिकाणी एक हलकीशी ‘कॅच’ जाणवते किंवा छोटासा नोच दिसतो, तो नंबर लक्षात ठेवा.

दुसऱ्या आणि तिसऱ्या चाकासाठीही हेच करा.

मिळालेल्या नंबरनंतर फक्त एकदा ते आकडे बदलून पाहा.

असे फक्त ३० कॉम्बिनेशन ट्राय करावे लागतात!

कोड कधीच विसरू नये यासाठी टिप्स

लक्षात राहील असाच कोड ठेवा. पण जन्मतारीख टाळा कारण ती ४ अंकांची असते.

कामाला येणारे पर्याय:

  • तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे ३ अंक

  • फ्लॅट नंबर (तिन अंकी असल्यास)

  • तुमचे ‘लक्की नंबर’

  • कोड सेट केल्यावर तो फोनच्या नोटमध्ये लिहून ठेवा

  • कोड सेट झाल्यानंतर ३ वेळा टेस्ट करा

  • डायल अडकत असेल तर कंप्रेस्ड एअरने साफ करा

फक्त काहीच सेकंदांत लॉक रीसेट! प्रवासात सुटकेस लॉक विसरणाऱ्यांसाठी भन्नाट हॅक
तुमच्या मोबाईलमधला व्हिडिओ खरा की बनावट? AI व्हिडिओ ओळखण्याच्या 'या' ५ टिप्स नक्की लक्षात ठेवा

प्रवासाचा ताण वाढवण्यासाठी नाही तर सुरक्षित ठेवण्यासाठी सुटकेसला लॉक असतो. सुटकेस जरी वेगवेगळ्या प्रवासासाठी बदलत असली तरी कोडांच्या या टिप्समुळे लॉकचं टेन्शन कधी येत नाही. या सगळ्या उपायांनी तुम्ही काही वेळातच लॉक रीसेट करू शकता आणि कोड विसरला तरी सहज उघडू शकता.

कारण शेवटी प्रवास म्हणजे मन मोकळं करणारा अनुभव आहे. त्यात सुटकेस लॉकसारखी छोटी गोष्ट अडथळा बनायला नको. जग फिरा, नवीन क्षण जगा… आणि तुमच्या सुटकेसचा कोड? तो नेहमी तुमच्या नियंत्रणात ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in