Summer Special : उन्हाळ्यातील थंडगार ट्रीट ‘गुलाब कुल्फी’; घरीच बनवा क्रीमी डेझर्ट

उन्हाळ्यातील उकाड्यात थंडगार दिलासा देणारी गुलाब कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते जाणून घ्या. सोपी रेसिपी, कमी साहित्य आणि क्रीमी, सुगंधित चव या खास डेझर्टने कुटुंबासोबत गोड आनंद अनुभवा.
Summer Special : उन्हाळ्यातील थंडगार ट्रीट ‘गुलाब कुल्फी’; घरीच बनवा क्रीमी डेझर्ट
Published on

उन्हाळा सुरू झाला की थंडगार कुल्फी खाण्याचा मोह आवरत नाही. बाजारात अनेक फ्लेवर्स मिळत असले तरी घरी बनवलेली कुल्फी वेगळीच चव देऊन जाते. अशाच खास आणि सुगंधी चवीची गुलाब कुल्फी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता.

गुलाबाचा हलका सुगंध आणि दुधाची रिच चव यामुळे ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती ठरते. शिवाय घरी बनवल्यामुळे ती अधिक शुद्ध आणि हेल्दीही असते. फारसं साहित्य किंवा विशेष मशीन न वापरता ही कुल्फी सहज बनवता येते.

Summer Special : उन्हाळ्यातील थंडगार ट्रीट ‘गुलाब कुल्फी’; घरीच बनवा क्रीमी डेझर्ट
उन्हाळ्यात थंडगार 'शहाळ्याचे आईस्क्रीम'; घरच्या घरी बनवा हेल्दी आणि चवदार डेझर्ट

साहित्य:

  • १ लिटर फुल फॅट दूध

  • अर्धा कप साखर

  • २-३ चमचे गुलाब सिरप

  • १ चमचा गुलाबजल

  • काजू, बदाम, पिस्ते (चिरलेले)

  • वेलची पूड

कृती:

सर्वप्रथम जाड लेअरच्या भांड्यात दूध गरम करून ते अर्धे होईपर्यंत आटवा. त्यात साखर घालून चांगले ढवळा. नंतर गुलाब सिरप, गुलाबजल आणि वेलची पूड मिसळा. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.

थंड झालेलं मिश्रण कुल्फीच्या साच्यात किंवा कपात ओतून ६-८ तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. सेट झाल्यावर थंडगार आणि क्रीमी गुलाब कुल्फी सर्व्ह करा.

Summer Special : उन्हाळ्यातील थंडगार ट्रीट ‘गुलाब कुल्फी’; घरीच बनवा क्रीमी डेझर्ट
बाजारच्या आईस्क्रीमला द्या ब्रेक; घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मटका कुल्फी

टिप्स:

  • नैसर्गिक गुलाबी रंगासाठी थोडासा बीटरूट ज्यूस वापरू शकता

  • अधिक क्रीमी टेक्स्चरसाठी मलाई घाला

  • साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क वापरल्यास चव अजून छान लागते

उन्हाळ्याच्या उकाड्यात घरच्या घरी तयार केलेली ही क्रीमी गुलाब कुल्फी नक्की ट्राय करा!

logo
marathi.freepressjournal.in