

उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पदार्थांची ओढ आपोआप वाढते. बाहेरून आणलेले आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला पर्याय अधिक सुरक्षित आणि पौष्टिक ठरतो. अशातच शहाळ्यापासून तयार होणारे आईस्क्रीम हा एक नैसर्गिक, हलका आणि चवदार पर्याय आहे, जो शरीराला थंडावा देण्यास मदत करतो.
बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि रंग यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याऐवजी शहाळ्याचे आईस्क्रीम नैसर्गिक गोडवा आणि पोषणमूल्यांनी भरलेले असल्याने उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो.
साहित्य
मऊ खोबर
शहाळ्याचे पाणी
काजू
मलाई
साखर
सुका मेवा
कृती
सर्वप्रथम शहाळ्याचे पाणी आणि मऊ खोबर वेगळे काढून घ्या
खोबऱ्याचे छोटे तुकडे करा
काजू काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा
मिक्सरमध्ये खोबर, काजू, मलाई, नारळाचे पाणी आणि साखर घालून बारीक पेस्ट तयार करा
तयार मिश्रण मोल्ड किंवा वाट्यांमध्ये घाला
वरून खोबऱ्याचे तुकडे आणि सुका मेवा घाला
हे मिश्रण फ्रिजमध्ये सुमारे ६ तास सेट होण्यासाठी ठेवा
सर्व्ह करताना
थंडगार झाल्यानंतर हे आईस्क्रीम सर्व्ह करा. नैसर्गिक चव आणि हलका गोडवा यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेत स्वादिष्ट पदार्थ खायचा असेल, तर शहाळ्याचे आईस्क्रीम हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.