पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त

पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक आणि खमंग लाटीवडी घरच्या घरी कशी बनवायची? जाणून घ्या साहित्य, स्टेप बाय स्टेप रेसिपी, टिप्स आणि पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी उत्तम स्नॅकची माहिती.
पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त
पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदेशाची खाद्यसंस्कृती वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक पदार्थ आजही त्यांच्या खास चवीमुळे घराघरांत आवडीने बनवले जातात. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे लाटीवडी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार सारणाने भरलेली लाटीवडी चहा, नाश्ता किंवा पाहुणचारासाठी उत्तम पर्याय ठरते. मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ एकदा चाखला की त्याची चव पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.

लाटीवडीसाठी लागणारे साहित्य

आवरणासाठी

  • १ कप गव्हाचे पीठ

  • ½ कप बेसन

  • ½ टीस्पून हळद

  • १ टीस्पून लाल तिखट

  • ½ टीस्पून ओवा

  • ३ ते ४ टेबलस्पून गरम तेल (मोहन)

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त
पावसाळ्यात गरमागरम पिठी-भाताची चवच न्यारी! ही सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

सारणासाठी

  • ½ कप कारळ

  • २ टेबलस्पून पांढरे तीळ

  • २ टेबलस्पून खसखस

  • २ कप किसलेले सुके खोबरे

  • १० ते १२ लसूण पाकळ्या

  • ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ टेबलस्पून घाटी मसाला

  • २ टेबलस्पून तेल

कृती

सर्वप्रथम गव्हाचे पीठ, बेसन, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ आणि गरम तेल एकत्र करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालत मऊसर कणिक मळून घ्या. कणिक १० ते १५ मिनिटे झाकून ठेवून मुरू द्या.

यानंतर कढईमध्ये कारळ, तीळ, खसखस आणि सुकं खोबरं वेगवेगळं कोरडं भाजून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये लसूण घालून भरडसर वाटून घ्या.

आता या मिश्रणात चिरलेली कोथिंबीर, घाटी मसाला आणि थोडं तेल घालून सारण तयार करा.

मुरलेल्या कणकेचे गोळे करून पातळ पोळी लाटा. त्यावर तयार सारण समान पसरवा आणि रोल करून घ्या. रोलचे समान आकाराचे तुकडे कापा.

पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त
जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा खमंग वांगी तवा फ्राय; १० मिनिटांत होईल झटपट तयार
पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त
पावसाळ्यात गरमागरम भुट्टा तर नेहमीच खाता; यावेळी ट्राय करा रेस्टॉरंट स्टाईल कॉर्न सूप!

हे तुकडे चाळणीत ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. पूर्ण थंड झाल्यानंतर गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

गरमागरम चहा किंवा हिरव्या चटणीसोबत ही खमंग लाटीवडी सर्व्ह करा.

लाटीवडी अधिक चविष्ट बनवण्यासाठी टिप्स

  • सारण भरडसर वाटल्यास चव अधिक खुलते.

  • वाफवल्यानंतर वड्या पूर्ण थंड झाल्यावरच तळाव्यात.

  • तळताना मध्यम आचेचा वापर केल्यास वड्या अधिक कुरकुरीत होतात.

  • घाटी मसाल्यामुळे अस्सल पारंपरिक चव मिळते.

logo
marathi.freepressjournal.in