स्वयंपाकघर स्वच्छ ठेवता? आधी 'या' ३ गोष्टी खरंच साफ आहेत का ते पाहा

फक्त ओटा स्वच्छ केला, भांडी धुतली म्हणजे किचन स्वच्छ झालं, असं नाही. कारण ज्या वस्तू वापरून आपण किचन स्वच्छ करतो, त्या वस्तू स्वतः किती स्वच्छ आहेत, याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ह्याच 'स्वच्छतेच्या साधनांमधून' कधी नकळत जंतू पसरतात आणि आरोग्याचा धोका वाढतो, हे आपल्या लक्षातही येत नाही.
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवता? आधी 'या' ३ गोष्टी खरंच साफ आहेत का ते पाहा
Published on

आपण सगळेच आपलं किचन नेहमी स्वच्छ ठेवतो. कारण जिथे रोज जेवण बनतं, तिथे स्वच्छता असणं अत्यंत गरजेचं असतं. किचन किती स्वच्छ आहे, याचा थेट आपल्या घरातल्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणूनच ओटा नीट पुसणं, भांडी चमकवणं, गॅस स्वच्छ करणं अशा अनेक गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देतो. पण फक्त ओटा स्वच्छ केला, भांडी धुतली म्हणजे किचन पूर्णपणे सुरक्षित आणि स्वच्छ झालं, असं समजणं चुकीचं ठरू शकतं.

कारण ज्या वस्तू वापरून आपण किचन स्वच्छ करतो, त्या वस्तू स्वतः किती स्वच्छ आहेत, याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ह्याच 'स्वच्छतेच्या साधनांमधून' कधी नकळत जंतू पसरतात आणि आरोग्याचा धोका वाढतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. म्हणूनच किचनमधील या तीन गोष्टींकडे विशेष लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

१) किचन स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं कापड

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवता? आधी 'या' ३ गोष्टी खरंच साफ आहेत का ते पाहा
ऑफिसला जायच्या आधीची डोकेदुखी संपली! अवघ्या १० सेकंदांत परफेक्ट 'टाय नॉट'; पाहा Video

ओटा पुसायला, गॅस साफ करायला, हात पुसायला किंवा गरम भांडी धरायला हेच एक कापड सतत वापरात असतं. हे कापड अनेकदा ओलसर राहतं आणि तेच आपण दिवसभर किचनमध्ये वापरतो. अशा कापडात बॅक्टेरिया खूप वेगाने वाढतात. तेच कापड पुन्हा ओटा, भांडी, टेबल यावर वापरल्यामुळे जंतू सगळीकडे पसरतात. त्यामुळे किचन कापड रोज धुणं आणि नीट वाळवणं फार महत्त्वाचं आहे.

२) भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्पंज / स्क्रब

भांडी स्वच्छ करणारा स्पंज दिसायला साधा वाटतो, पण तोच किचनमधील सर्वात घाणेरड्या वस्तूंमध्ये गणला जातो. अन्नकण, तेलकटपणा आणि ओलसरपणा यामुळे स्पंजमध्ये लाखो जंतू तयार होतात. तोच स्पंज रोज वापरल्यामुळे भांडी स्वच्छ होण्याऐवजी अधिक जंतू लागण्याचा धोका असतो. म्हणूनच स्पंज आठवड्यातून एकदा तरी बदलणं गरजेचं आहे.

३) बेसिन (सिंक)

संपूर्ण किचनमधलं घाणेरडं पाणी, अन्नाचे उरलेले कण सगळं बेसिनमधूनच जातं. त्यामुळे बेसिन आणि त्याचा ड्रेन हा जंतूंचा मोठा अड्डा बनतो. वरून पाणी सोडून बेसिन स्वच्छ वाटत असलं, तरी आत जंतू साचलेले असतात. नियमितपणे गरम पाणी किंवा जंतुनाशक वापरून बेसिन साफ करणं आवश्यक आहे.

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवता? आधी 'या' ३ गोष्टी खरंच साफ आहेत का ते पाहा
नवे वर्ष, नवा संकल्प! २८ दिवसांत ६ किलो वजन कमी करा; न्यूट्रिशनिस्टने दिला भन्नाट डाएट प्लान

थोडक्यात काय लक्षात ठेवाल?

किचन फक्त दिसायला स्वच्छ असणं पुरेसं नाही. ज्या वस्तू वापरून आपण स्वच्छता करतो, त्या वस्तू देखील स्वच्छ आहेत का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. छोट्या सवयी बदलल्या, तर किचन खर्‍या अर्थाने सुरक्षित आणि स्वच्छ बनू शकतं.

logo
marathi.freepressjournal.in