बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!

यंदा काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असाल, तर घरच्या घरीच रोमँटिक कँडल लाईट डिनरचा प्लॅन करा.
बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
(Photo-Pinterest)
Published on

व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) म्हटलं की डोळ्यासमोर येतात महागडे रेस्टॉरंट्स, तेथील गर्दी आणि आधीच फुल झालेली बुकिंग. मात्र यंदा काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असाल, तर घरच्या घरीच रोमँटिक कँडल लाईट डिनरचा प्लॅन करा. थोडीशी तयारी, योग्य प्लॅनिंग आणि भरपूर प्रेम, जोडीदारासोबत खास आणि अविस्मरणीय वेळ घालवण्यासाठी इतकंच पुरेसं आहे.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Week : नातं अधिक घट्ट करणारा Hug Day; मिठी मारल्याने नक्की काय होतं?

योग्य जागेची निवड करा :

घरातील शांत आणि आरामदायी जागा निवडा - हॉल, बाल्कनी किंवा टेरेस उत्तम पर्याय ठरू शकतात. अनावश्यक वस्तू बाजूला करून जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. खिडक्या उघड्या असतील आणि हलकीशी गार हवा असेल, तर वातावरण अधिक प्रसन्न आणि रोमँटिक होईल.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Gift Idea: गुलाब-चॉकलेट्स विसरा! वाचा Valentine’s Day साठी खास गिफ्ट आयडियाज

लाईटिंग आणि डेकोरेशन :

घरातील मुख्य लाईट बंद ठेवून कँडल्स, फेरी लाईट्स किंवा मंद प्रकाशाचे दिवे वापरा. लाल किंवा पांढऱ्या रंगाचा टेबलक्लॉथ वापरल्यास रोमँटिक टच मिळतो. टेबलवर गुलाबाच्या पाकळ्या, छोटीशी फूलदाणी किंवा फुलांनी हार्ट शेप डेकोरेशन करा. सुगंधी मेणबत्त्या वापरल्यास वातावरण अधिक खास आणि आल्हाददायक वाटेल.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Gift Idea: गुलाब-चॉकलेट्स विसरा! वाचा Valentine’s Day साठी खास गिफ्ट आयडियाज

खास मेन्यू प्लॅन करा :

जोडीदाराला आवडणारे पदार्थच मेन्यूमध्ये ठेवा. शक्यतो, हलके आणि कमी वेळात तयार होणारे पदार्थ निवडा, जेणेकरून जास्त वेळ स्वयंपाकघरात न जाता एकमेकांसोबत घालवता येईल.

  • Starter: सूप, चीज बॉल्स किंवा गार्लिक ब्रेड

  • Main Course: पनीर बटर मसाला, पुलाव/नान किंवा पास्ता

  • Dessert: चॉकलेट मूस, गुलकंद शिरा किंवा आईस्क्रीम

घरगुती पण चविष्ट असा मेन्यू तुमच्या डिनरला खास बनवेल.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Day Special : रेड ड्रेसमध्ये दिसा क्लासी आणि ट्रेंडी! परफेक्ट लूकसाठी पाहा Photo's

बॅकग्राउंड म्युझिक :

हलकीशी रोमँटिक गाणी कमी आवाजात लावा. सौम्य संगीतामुळे वातावरण अधिक जादुई आणि भावनिक बनते. आवडत्या गाण्यांमुळे जुन्या आठवणीही ताज्या होतील.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine's Day : सावधान‌.‌.. प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय; प्रेमाच्या अभिव्यक्तीचे डिजिटल फंडे

छोटंसं सरप्राईज ठेवा :

  • हाताने लिहिलेलं प्रेमपत्र

  • छोटंसं गिफ्ट

  • फोटो फ्रेममध्ये एखादी खास आठवण

या छोट्या गोष्टीसुद्धा जोडीदाराच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आणू शकतात.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Day Special : प्रेम व्यक्त करण्याची सुंदर संधी; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा

सर्वात महत्त्वाचं - तुमचा वेळ

मोबाईल सायलेंटवर ठेवा. सोशल मीडियापेक्षा जोडीदाराला प्राधान्य द्या. मनमोकळ्या गप्पा मारा, जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि भविष्यातील स्वप्नांवर चर्चा करा. कारण शेवटी, वेळ आणि साथ हीच सर्वात मोठी भेट असते.

बिझी शेड्युलमुळे बाहेर जाता येत नाही? यंदा Valentine’s Day ला घरीच करा Candle Light Dinner; जोडीदाराला द्या खास सरप्राईज!
Valentine’s Day Special : घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी केक; नोट करा स्पेशल रेसिपी

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी महागडी जागा किंवा मोठा खर्च आवश्यक नाही. प्रेम, वेळ आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी असेल, तर घरचं वातावरणही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी वाटणार नाही. यंदा 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त घरच्या घरी कँडल लाईट डिनर करून आपल्या नात्याला एक नवीन उजाळा द्या.

logo
marathi.freepressjournal.in