Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास पोटही भरते आणि अतिरिक्त कॅलरींचे सेवनही टाळता येते.
Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ
Published on

वजन कमी करण्याचा विचार आला की अनेकजण आवडते पदार्थ खाणे बंद करतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी राहणे किंवा सतत डाएटिंग करणे हा योग्य मार्ग नाही. योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास पोटही भरते आणि अतिरिक्त कॅलरींचे सेवनही टाळता येते.

विशेष म्हणजे काही चविष्ट पदार्थ असे आहेत, जे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात उपयुक्त ठरू शकतात.

मोड आलेली कडधान्ये

मूग, मटकी, हरभरा यांसारख्या कडधान्यांना मोड आणून त्याची कोशिंबीर, चाट किंवा उसळ तयार करता येते. यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स की सब्जा? जाणून घ्या कोणतं बी ठरतं अधिक फायदेशीर

ताक आणि दही

उन्हाळ्यात ताक आणि दही हे आरोग्यासाठी उत्तम पर्याय मानले जातात. जिरे, आले किंवा कोथिंबीर घालून बनवलेले ताक पचन सुधारण्यास मदत करते. दही शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते आणि भूक नियंत्रित ठेवण्यास हातभार लावते.

ज्वारी-बाजरी आणि इतर मिलेट्स

मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्वारीची भाकरी, बाजरीचे थालीपीठ किंवा विविध मिलेट्सपासून बनवलेले डोसे हे चवदार आणि पोटभर पदार्थ ठरू शकतात.

ओट्सचे विविध पदार्थ

फक्त ओट्सची पेजच नव्हे तर ओट्सचा उपमा, डोसा किंवा भाज्यांसोबत तयार केलेले पदार्थही चविष्ट लागतात. ओट्समधील सोल्युबल फायबर पचनक्रिया मंद ठेवते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ
Health Tips : वजन कमी करायचंय? रोज ‘या’ पद्धतीने खा पपई; पोटाची चरबी होऊ शकते कमी

सूपचा समावेश करा

डाळी, भाज्या किंवा मिलेट्सपासून बनवलेले सूप हलके आणि पौष्टिक असते. जेवणापूर्वी सूप घेतल्यास कमी प्रमाणात अन्न खाल्ले जाते आणि कॅलरींचे सेवन नियंत्रणात राहते.

फर्मेंटेड पदार्थांचा फायदा

इडली, डोसा किंवा आंबवलेल्या धान्यांपासून बनवलेले पदार्थ पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जातात. चांगले पचन हे वजन नियंत्रणातील महत्त्वाचे पाऊल असल्याने अशा पदार्थांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.

Weight Loss Diet : वजन कमी करण्याचा स्वादिष्ट फंडा; आहारात समाविष्ट करा 'हे' ६ हेल्दी पदार्थ
वजन कमी करायचंय पण आवडतं खाणं सोडायचं नाही? करीना कपूरच्या डायटिशियनचा 'ओव्हरईटिंग' थांबवण्याचा सोपा फॉर्म्युला

लक्षात ठेवा...

वजन कमी करण्यासाठी चविष्ट पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. योग्य प्रमाण, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधता येऊ शकतो.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीनुसार देण्यात आली आहे.‘नवशक्ति’ या माहितीच्या अचूकता किंवा परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in