Winter Skin Care : हिवाळ्यात हातांची त्वचा झालीये कोरडी आणि खरखरीत? घरच्या घरी तयार करा हे खास मसाज मिश्रण

हिवाळ्यात हातांची त्वचा कोरडी, खरखरीत आणि सुरकुतल्यासारखी दिसतेय? हातांचा मऊपणा टिकवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या हा सोपा घरगुती उपाय आणि मसाज करण्याची योग्य पद्धत.
Winter Skin Care : हिवाळ्यात हातांची त्वचा झालीये कोरडी आणि खरखरीत? घरच्या घरी तयार करा हे खास मसाज मिश्रण
Winter Skin Care : हिवाळ्यात हातांची त्वचा झालीये कोरडी आणि खरखरीत? घरच्या घरी तयार करा हे खास मसाज मिश्रण'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ लागतो. याचा परिणाम चेहऱ्याबरोबरच हातांवरही दिसून येतो. सतत पाणी, साबण आणि डिटर्जंटच्या संपर्कात येणाऱ्या हातांची त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. त्यामुळे हात खरखरीत दिसतात, त्वचेवर सुरकुत्या पडल्यासारख्या जाणवतात. अशावेळी हातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी घरच्या घरी काही साहित्य वापरून मसाज मिश्रण तयार करता येऊ शकतं.

हातांसाठी घरच्या घरी तयार करा मसाज मिश्रण

हातांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, तांदळाचं पीठ, ग्रीन टी आणि ॲलोव्हेरा जेल यांचा वापर करून हे मिश्रण तयार करता येईल. ही कृती सोपी असून त्यासाठी फार साहित्यही लागत नाही.

Winter Skin Care : हिवाळ्यात हातांची त्वचा झालीये कोरडी आणि खरखरीत? घरच्या घरी तयार करा हे खास मसाज मिश्रण
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम

मिश्रण तयार करण्यासाठी साहित्य :

  • २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

  • १ चमचा तांदळाचं पीठ

  • १ ग्रीन टी बॅग

  • १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल

कसं तयार करायचं मिश्रण?

सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात ऑलिव्ह ऑईल आणि तांदळाचं पीठ एकत्र करा. त्यात ग्रीन टीची बॅग टाका. आता डबल बॉयलर पद्धतीने हे मिश्रण १० ते १५ मिनिटे हलक्या आचेवर गरम करा. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर मिश्रणाचं भांडं ठेवा. मिश्रण थेट गॅसवर गरम करू नका.

त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळा. अशा प्रकारे हातांना लावण्यासाठी मिश्रण तयार होईल.

Winter Skin Care : हिवाळ्यात हातांची त्वचा झालीये कोरडी आणि खरखरीत? घरच्या घरी तयार करा हे खास मसाज मिश्रण
Winter Hair Care : हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझीनेस वाढलाय? तज्ज्ञांनी सांगितले केसांची काळजी घेण्याचे सोपे उपाय

हातांना मसाज कसा करावा?

सर्वप्रथम हात स्वच्छ धुऊन कोरडे करा. त्यानंतर तयार मिश्रण थोड्या प्रमाणात हातांवर लावा. बोटं, तळहात आणि हाताच्या मागील बाजूला हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मसाज करा. मसाज झाल्यानंतर हात स्वच्छ धुऊन घ्या. त्वचेचा कोरडेपणा जाणवत असल्यास नियमित मॉइश्चरायझर लावण्याची सवय ठेवा.

या गोष्टी लक्षात ठेवा : प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे हे मिश्रण वापरण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापरणं थांबवा. हातांच्या त्वचेवर भेगा, जखमा किंवा तीव्र त्रास असल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती सामान्य स्वरूपाची असून घरगुती उपायांच्या परिणामांची नवशक्ती हमी देत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तो आपल्या त्वचेला योग्य आहे की नाही, याची खात्री करा.)