हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? घरच्या घरी तयार करा ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक लाडू

हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी आहारात समावेश करा सुका मेवा, तीळ आणि अळशीपासून तयार केलेल्या पौष्टिक लाडूचा. जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे.
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? घरच्या घरी तयार करा ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक लाडू
Published on: 

दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणं, सततचा प्रवास, घरातील कामांची धावपळ आणि व्यायामासाठी पुरेसा वेळ न मिळणं याचा परिणाम अनेकदा आपल्या आरोग्यावर होतो. काही जणांना थकवा, अशक्तपणा जाणवतो, तर काहींना गुडघे किंवा कंबरदुखीचा त्रासही सतावतो. हिवाळ्यात थंडीमुळे आधीपासून असलेली सांधेदुखी अधिक जाणवू शकते. अशा वेळी केवळ पोट भरणारा नव्हे, तर शरीराला आवश्यक पोषक घटक देणारा आहार घेणं महत्त्वाचं ठरतं.

हिवाळ्यात आहारात तीळ, अळशी, सुका मेवा आणि बियांचा समावेश करता येतो. या पदार्थांपासून तयार केलेला पौष्टिक लाडू नाश्त्यासोबत किंवा सकाळच्या अल्पोपाहारात खाता येऊ शकतो. यातून शरीराला ऊर्जा आणि काही महत्त्वाचे पोषक घटक मिळतात. चला तर मग, हा लाडू घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी साहित्य

  • काजू - १०० ग्रॅम

  • बदाम - १०० ग्रॅम

  • अक्रोड - ५० ग्रॅम

  • मगज बिया - ५० ग्रॅम

  • तीळ - ५० ग्रॅम

  • भोपळ्याच्या बिया - ५० ग्रॅम

  • अळशी - ७० ते ८० ग्रॅम

  • डिंक - ५० ग्रॅम

  • खसखस - ५० ग्रॅम

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? घरच्या घरी तयार करा ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक लाडू
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून शुगर मॅनेज करण्यापर्यंत; ७ धान्यांची भाकरी ठरेल फायदेशीर
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? घरच्या घरी तयार करा ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक लाडू
Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम
  • किसलेलं सुके खोबरे - ५० ते ६० ग्रॅम

  • बेदाणे - ५० ग्रॅम

  • खजूर - ४०० ग्रॅम

  • साजूक तूप - २ ते ३ मोठे चमचे

  • वेलची पूड - अर्धा चमचा

लाडू बनवण्याची सोपी कृती

१. सुका मेवा भाजून घ्या : सर्वप्रथम कढईत थोडं तूप गरम करून काजू आणि बदाम मंद आचेवर हलके भाजून घ्या. त्यानंतर अक्रोड घालून काही वेळ परतून घ्या. हे मिश्रण एका ताटात काढून थंड होऊ द्या.

२. बिया आणि डिंक तयार करा : दुसऱ्या कढईत तीळ आणि अळशी कोरडी भाजून घ्या. भोपळ्याच्या आणि मगज बियाही हलक्या परतून घ्या. खसखस मंद आचेवर भाजा. त्यानंतर खसखस, तीळ आणि अळशी जाडसर वाटून घ्या. डिंक तुपात फुलवून त्याचा बारीक चुरा करा.

३. खजुराचं मिश्रण तयार करा : खजुरातील बिया काढून त्याचे छोटे तुकडे करा. कढईत थोडं तूप घालून खजूर मंद आचेवर मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता भाजलेला सुका मेवा, बिया, डिंक, खोबरं आणि बेदाणे एकत्र करा.

४. लाडू वळून घ्या : तयार मिश्रणात मऊ केलेला खजूर आणि वेलची पूड घालून व्यवस्थित एकजीव करा. मिश्रण हाताळण्याइतपत कोमट असतानाच त्याचे छोटे लाडू वळून घ्या. मिश्रण खूप कोरडं वाटल्यास गरजेनुसार थोडं तूप घालू शकता.

हिवाळ्यात आहारात का करावा समावेश?

या लाडूमध्ये बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि अळशी यांसारखे घटक असल्यामुळे त्यातून चांगले फॅट्स, प्रथिने आणि इतर पोषक घटक मिळतात. तीळ आणि खसखसमध्ये कॅल्शियम असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. खजूर नैसर्गिक गोडवा देतो आणि ऊर्जेचा स्रोत ठरतो.

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? घरच्या घरी तयार करा ड्रायफ्रूट्सचा पौष्टिक लाडू
Winter Hair Care : हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझीनेस वाढलाय? तज्ज्ञांनी सांगितले केसांची काळजी घेण्याचे सोपे उपाय

सकाळी नाश्त्यासोबत एक छोटा लाडू खाऊ शकता. मात्र, यात सुका मेवा, बिया आणि खजूर असल्यामुळे लाडू पौष्टिक असला तरी त्यात कॅलरी आणि नैसर्गिक साखरेचं प्रमाणही असतं. त्यामुळे प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. मधुमेह असल्यास किंवा आहारावर विशेष निर्बंध असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लाडू साठवताना काय काळजी घ्याल?

लाडू पूर्ण थंड झाल्यानंतरच स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. ओलसर हात किंवा चमचा वापरू नका. हवामान आणि साठवणुकीच्या पद्धतीनुसार ते किती दिवस टिकतील हे बदलू शकतं. वास किंवा चव बदलल्यास ते खाऊ नका.

लक्षात ठेवा : या लाडूमुळे गुडघेदुखी किंवा कंबरदुखी बरी होते अथवा हाडं लगेच मजबूत होतात, असं म्हणता येत नाही. संतुलित आहार, नियमित हालचाल आणि पुरेसा व्यायाम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. वेदना सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.