Pune : आळंदीत दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला; पोलिसांकडून अटक

तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या दानपेटीवर एका विश्वासू सेवेकऱ्यानेच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune : आळंदीत दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला; पोलिसांकडून अटक
Pune : आळंदीत दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला; पोलिसांकडून अटक
Published on

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या दानपेटीवर एका विश्वासू सेवेकऱ्यानेच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माऊलींच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानावर हात साफ करणाऱ्या विशाल बाळू वारुळे या सेवेकऱ्याला आळंदी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या घरातून पावणे चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वारुळेवाडी येथील रहिवासी असलेला विशाल वारुळे हा सुमारे वर्षभरापूर्वी मंदिरात आला होता. सुरुवातीला त्याने भोजनालयातील आचाऱ्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर हळूहळू कॅशियरशी जवळीक वाढवून स्वतःला प्रामाणिक सिद्ध केले. त्याच्या या 'प्रामाणिक' वागण्यावर विश्वास ठेवून मंदिर प्रशासनाने त्याला तीन महिन्यांपूर्वी दानपेटीतील रक्कम जमा करण्याच्या कामात सहभागी करून घेतले. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने चोरीचे सत्र सुरू केले.

तपासात समोर आले आहे की, १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत त्याने दानपेटीतील रक्कम मोजताना नजर चुकवून चोरी केली होती.

Pune : आळंदीत दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला; पोलिसांकडून अटक
Mumbai : गरीबनगरवर बुलडोझर! वांद्रे पूर्व येथे रेल्वेची मोठी कारवाई; पाच दिवस चालणार मोहीम, ४०० अनधिकृत बांधकामे हटवणार

विशालची चोरी करण्याची पद्धत अत्यंत अनोखी आणि नियोजनबद्ध होती. दानपेटी उघडल्यानंतर रक्कम बादलीत भरत असताना तो काही रक्कम गुपचूप स्वतः आणलेल्या पिशवीत भरत असे. ही रोकड बाहेर नेण्यासाठी तो एक शक्कल लढवायचा; तो मंदिरातील हार घरी घेऊन जात असल्याचे सांगायचा आणि पिशवीत वरच्या बाजूला हार दिसेल अशा बेताने ठेवायचा, जेणेकरून खाली असलेली रोकड कोणाला दिसणार नाही. घरी पोहोचल्यावर तो ही रोकड मोजून आपल्या बेडमध्ये लपवून ठेवत असे. पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केलेल्या रोकडमध्ये १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

सीसीटीव्ही स्क्रीनसमोर बसलेल्या कर्मचाऱ्याला विशालच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याने दोन दिवस त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले आणि ही बाब देवस्थान प्रशासनाच्या कानावर घातली. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली.

logo
marathi.freepressjournal.in