सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

शिवसेना (ठाकरे) पक्ष सोडताच सचिन अहिर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...
सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...
Published on

मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. कोणाचेही नाव न घेता केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी "जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी" असे म्हणत पक्षांतरावर अप्रत्यक्ष टीका केली.

महायुतीकडून उपसभापतीपदाची उमेदवारी

शिवसेना (ठाकरे) पक्ष सोडताच सचिन अहिर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल

संजय राऊतांचा सूचक टोला

अहिर यांच्या पक्षांतरानंतर खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वर 'उषःकाल होता होता' या गाण्याच्या ओळी शेअर करत प्रतिक्रिया दिली.

"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?"

या पोस्टखाली त्यांनी आणखी एक टिप्पणी करत म्हटले, "पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे."

संजय राऊत यांनी सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा फोटो शेअर करत कोणतेही नाव न घेता त्यांच्यावर सूचक टीका केली. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

शिंदे गटाची रणनीती कायम

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेत्यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यापूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता विधान परिषद आणि विधानसभेतील लोकप्रतिनिधींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटातील नेत्यांनीही ठाकरे गटातील आणखी काही आमदार आणि विधान परिषद सदस्य त्यांच्या संपर्कात असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील दोन्ही शिवसेना गटांतील राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in