BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून स्थानिक प्रश्न, विकास आणि पारदर्शक प्रशासनावर पक्षाचा भर राहणार आहे.
BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु
BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु
Published on

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनुभवी, स्थानिक प्रश्नांशी जोडलेले आणि कार्यक्षम उमेदवार मैदानात उतरवून मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्थानिक विकास आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मनसेचा भर राहणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु
BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

मनसेची मुंबईतील उमेदवारांची यादी :

प्रभाग क्रमांक १९२ – यशवंत किल्लेदार

प्रभाग क्रमांक १८३ – पारूबाई कटके

प्रभाग क्रमांक ८४ – रूपाली दळवी

प्रभाग क्रमांक १०६ – सत्यवान दळवी

प्रभाग क्रमांक ६८ – संदेश देसाई

प्रभाग क्रमांक २१ – सोनाली देव मिश्रा

प्रभाग क्रमांक ११ – कविता बागुल माने

प्रभाग क्रमांक १५० – सविता माऊली थोरवे

प्रभाग क्रमांक १५२ – सुधांशू दुनबाळे

प्रभाग क्रमांक ८१ – शबनम शेख

प्रभाग क्रमांक १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव

प्रभाग क्रमांक १२९ – विजया गीते

प्रभाग क्रमांक १८ – सदिच्छा मोरे

प्रभाग क्रमांक ११० – हरिनाक्षी मोहन चिराथ

प्रभाग क्रमांक २७ – आशा विष्णू चांदर

BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु
BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

या यादीतून मनसेने महिला, युवक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होते. येत्या काळात उर्वरित वॉर्डसाठीही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

logo
marathi.freepressjournal.in