Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू

मुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन म्हणून बेस्टची ओळख. मात्र मार्च २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात बेस्ट बसच्या १०८ अपघातांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू
Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू(Photo-X)
Published on

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन म्हणून बेस्टची ओळख. मात्र मार्च २०२५ ते मार्च २०२६ या वर्षभरात बेस्ट बसच्या १०८ अपघातांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ७७ अपघात भाडेतत्त्वावरील बसचे, ३१ अपघात बेस्टच्या स्वमालकीच्या बसचे झाले आहेत.‌

बेस्ट उपक्रमाच्या दोन हजारांहून अधिक बसच्या माध्यमातून दररोज २५ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या गार व पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक एसी बसचा समावेश ताफ्यात करण्यास सुरुवात केली. मात्र भाडेतत्त्वावरील बसच्या अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईची दुसरी लाईफलाइन पादचारी, प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

मुंबईतील ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळातील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे या बसेसच्या सुरक्षिततेवर आणि चालकांच्या प्रशिक्षणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः ‘वेट-लीज’ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बसेस आणि ‘ऑलेक्ट्रा’ कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेसच्या अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे.

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण जागीच ठार

प्रमुख बेस्ट बस अपघात :

मालाड टॅक्सी अपघात (४ जून २०२६)

मालाड (पूर्व) येथील पुशपा पार्कजवळ एका बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ओला टॅक्सीला मागून जोरदार धडक दिली होती. या दरम्यान टॅक्सीचालक हा गाडी साफ करत असताना हा अपघात झाला. या अपघातात संबंधित ५० वर्षीय टॅक्सीचालकाचा जागीच मृत्यू झाला होता.

भांडुप पश्चिम अपघात (डिसेंबर २०२५)

भांडुप रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दीच्या परिसरात चालकाने इलेक्ट्रिक बस सुरू करताना गिअर मोड समजण्यात चूक केली. बस न्यूट्रल मोडमध्ये आहे असे समजून त्याने ॲक्सिलेटर दाबला, मात्र बस ड्राइव्ह मोडमध्ये असल्याने ती थेट फुटपाथवरील पादचाऱ्यांवर जाऊन धडकली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आणि १० हून अधिक लोक जखमी झाले.

कुर्ला पश्चिम येथील भीषण अपघात (९ डिसेंबर २०२४)

कुर्ला (पश्चिम) भागात कंत्राटी पद्धतीवरील एका इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटल्याने तिने रस्त्यावरील अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडले. हा मुंबईतील बेस्ट बसच्या सर्वात भीषण अपघातांपैकी एक मानला जातो. या दुर्घटनेत ८ नागरिकांना जीव गमवावा लागला. तर ४० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

...असे दिले जाते चालकांना प्रशिक्षण

  • भाडेतत्त्वावरील बसगाड्या पुरवठादार व्यावसायिक संस्था यांना बसचालकासहीत बसगाड्या पुरविणे अनिवार्य असल्यामुळे बसचालकांना दिंडोशी वाहतूक प्रशिक्षण येथे विद्यमान स्थितीत २१ दिवस प्रत्यक्ष बसगाडीवर तसेच ६ दिवस वर्गामध्ये उजळणी वर्गाचे प्रशिक्षण देण्यात येते.

  • आगारस्तरावर विभागीय वाहतूक पोलीस यांच्याकडून तसेच वाहतूक प्रशिक्षण केंद्र, दिंडोशी यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी समुपदेशनाचे आयोजन करण्यात येते.

  • मार्ग तपासणीदरम्यान पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच अधिकारी यांच्याकडून सदोष वाहन चालन आढळणाऱ्या बसचालकांवर कारवाई करण्यात येते.

  • भाडेतत्त्वावरील बसगाड्यांमध्ये ई-बसगाड्यांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव असल्यामुळे सदर बसगाड्यांवरील अद्ययावत कार्यप्रणालीबाबतचे रितसर प्रशिक्षण, दिंडोशी प्रशिक्षण केंद्र येथे देण्यात येते.

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोन जण ठार

अपघाताची कारणे :

मानवी चूक आणि चुकीचे आकलन : अनेक अपघातांमध्ये बसेस तांत्रिकदृष्ट्या सुस्थितीत होत्या (ब्रेक फेल्युअर नव्हते). परंतु ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या इलेक्ट्रिक बसेस चालवताना चालकांचा गोंधळ उडाला. ब्रेकऐवजी वेगात ॲक्सिलेटर दाबल्या गेल्याने अपघात झाले.

प्रशिक्षणाचा अभाव : ‘वेट-लीज’ मॉडेल अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी चालकांना या आधुनिक, हाय-टॉर्क असलेल्या इलेक्ट्रिक गाड्या चालवण्याचे योग्य व दीर्घकालीन प्रशिक्षण मिळालेले नव्हते. काही चालकांना ३ दिवसांचे प्रशिक्षण दिले होते.

कंत्राटी पद्धतीची आव्हाने : बेस्टच्या एकूण ताफ्यापैकी बहुतांश बसेस खासगी कंत्राटदारांच्या आहेत. या बसेसचे चालक बेस्टचे कर्मचारी नसून कंत्राटदाराचे असतात, ज्यामुळे त्यांच्यावर थेट प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येतात.

प्रशासनाचा निर्णय : वाढत्या अपघातांची दखल घेत बेस्ट प्रशासनाने सर्व सीएनजी आणि इलेक्ट्रिक वेट-लीज चालकांसाठी ४ आठवड्यांचे (१ महिना) सक्तीचे प्रशिक्षण अनिवार्य आहे.

Mumbai : दुसरी लाईफलाइन ठरतेय ‘काळ’...वर्षभरात ‘बेस्ट’च्या धडकेत ३२ जणांचा मृत्यू
Mumbai : दादरमध्ये BEST चा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहा जखमी, एक गंभीर

बेस्टचे ई-बसचे नियम :

सुधारित प्रशिक्षण कार्यपद्धती

पूर्वी कंत्राटी चालकांना केवळ १ आठवड्याचे (७ दिवस) प्राथमिक प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, वाढत्या मानवी चुका लक्षात घेऊन बेस्टने आता ४ आठवड्यांचे (१ महिना) कडक आणि अनिवार्य प्रशिक्षण सुरू केले आहे. गाडी थांबलेली असताना नेहमी Neutral (N) किंवा Park (P) मोडचा वापर करावा, असा सूचना आहेत.

तांत्रिक ओळख

डिझेल किंवा सीएनजी बसवरून थेट इलेक्ट्रिक बसवर शिफ्ट होताना चालकांना मोठ्या तांत्रिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यांना बॅटरी प्रणाली, ऑटोमॅटिक गियर मोड्स आणि डॅशबोर्डवरील तांत्रिक संकेतांची सविस्तर माहिती दिली जाते. इलेक्ट्रिक बस डेपोबाहेर पडण्यापूर्वी तिची संपूर्ण तांत्रिक तपासणी संबंधित अधिकाऱ्याकडून केली जाते.

Drive आणि Neutral मोडचे आकलन

भांडुप आणि कुर्ला येथील अपघातांमध्ये चालक ‘Neutral’ मोड समजून ॲक्सिलेटर दाबत होते. पण गाडी Drive मोडमध्ये असल्याने ती अचानक पुढे/मागे धावली. प्रशिक्षणात Drive (D) आणि Neutral (N) मधील फरक ओळखणे आणि हँडब्रेकचा योग्य वापर करण्याचे कडक धडे दिले जातात.

प्रगत ब्रेकिंग प्रणाली

इलेक्ट्रिक बसेसचे वजन जास्त असते आणि त्यांच्यात ब्रेक लावल्यावर ऊर्जा पुन्हा बॅटरीत जमा होणे ही प्रक्रिया असते. उतारावर किंवा अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवर ही प्रगत ब्रेकिंग सिस्टीम कशी हाताळायची याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक चालकांकडून करून घेतले जाते. बस चालविण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवली जाते.

आपत्कालीन परिस्थिती आणि आग नियंत्रण

मे महिन्यात कुर्ला, प्रतीक्षा नगर आणि सांताक्रूझ आगारात झालेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, बॅटरी ओव्हरहीट झाल्यास डॅशबोर्डवरील चेतावणी समजून घेणे, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे आणि आपत्कालीन स्थितीत ‘पॉवर कट-ऑफ’ बटणाचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले जाते.

logo
marathi.freepressjournal.in