मुंबईकरांसाठी पर्वणी! राणीच्या बागेत तीन दिवसांचा पुष्पोत्सव, काय असणार खास?

या पुष्पप्रदर्शनामुळे ऐतिहासिक वनस्पती उद्यान रंगीबेरंगी फुलांनी, सुगंधाने आणि हिरवाईने नटणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून कुटुंब, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि निसर्गप्रेमींना मोठ्या संख्येने येथे सहभागी होता येणार आहे.
मुंबईकरांसाठी पर्वणी! राणीच्या बागेत तीन दिवसांचा पुष्पोत्सव, काय असणार खास?
Published on

मुंबईत वसंत ऋतूची चाहूल लागताच, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘मुंबई फ्लॉवर शो २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसांचा भव्य पुष्पोत्सव ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय अर्थात राणीची बाग भायखळा येथे पार पडणार आहे.

या पुष्पप्रदर्शनात ऐतिहासिक वनस्पती उद्यान रंगीबेरंगी फुलांनी, सुगंधाने आणि हिरवाईने नटणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि निसर्गप्रेमींना मोठ्या संख्येने येथे सहभागी होता येणार आहे.

मुंबईकरांसाठी पर्वणी! राणीच्या बागेत तीन दिवसांचा पुष्पोत्सव, काय असणार खास?
Mumbai : उद्यापासून ९ दिवस रंगणार 'काळा घोडा' कला महोत्सव; फ्री पास कसा मिळवाल? जाणून घ्या

या प्रदर्शनात सुमारे ५,००० हून अधिक झाडे व रोपे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे तसेच औषधी वनस्पतींचा समावेश असेल. यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे १३ राष्ट्रीय प्रतीकांची फुलांच्या माध्यमातून साकारलेली मांडणी, जी केवळ नेत्रसुखदच नव्हे तर शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाची ठरणार आहे.

फुलांच्या प्रदर्शनासोबतच बागकामासाठी लागणारी अवजारे, रोपे, खते आणि इतर साहित्य विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. बागकामाची आवड असणाऱ्यांसाठी तसेच नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. याशिवाय, तीनही दिवस बागकाम विषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी १,००० रुपये सहभाग शुल्क आकारण्यात येणार आहे.

या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी उप आयुक्त (उद्यान) चंदा जाधव आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, नियोजन आणि देखरेख सुरळीतपणे केली जात आहे. हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईकरांसाठी हा पुष्पोत्सव शहराच्या मध्यभागीच निसर्गाच्या सान्निध्यात विसावा देणारा ठरणार आहे. बीएमसीने नागरिकांना या तीन दिवसांच्या फुलांच्या महोत्सवाला भेट देऊन निसर्गाच्या हिरवाईत मन रमवण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांसाठी पर्वणी! राणीच्या बागेत तीन दिवसांचा पुष्पोत्सव, काय असणार खास?
Kala Ghoda Arts Festival : मुंबईच्या कला महोत्सवाची ओळख असलेल्या 'काळा घोडा' नावामागची गोष्ट काय?

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पुष्पमहोत्सव मुंबईकरांसाठी एक बहुप्रतिक्षित वार्षिक उपक्रम ठरण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षीच्या पुष्पप्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. रंगीबेरंगी फुलांची मांडणी आणि राष्ट्रीय थीमवरील आकर्षक सजावटीमुळे भायखळा प्राणीसंग्रहालय संपूर्णपणे बदलून गेले होते. यंदाही तसाच उत्साह आणि मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in