Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

मुंबई कोस्टल रोडवरील 'मेलोडी रोड'वर रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCने निर्बंध लागू केले आहेत. आठवड्याच्या शेवटी रात्री 'जय हो' संगीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद
Published on

कोस्टल रोडवरील मेलोडी रोड सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच मुंबई महानगरपालिकेला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीनंतर दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद
Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

सततच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त

या विशेष मेलोडी रोडवरून वाहन गेल्यावर 'जय हो' हे गाणे वाजते. मात्र, सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सतत वाजणाऱ्या या संगीतामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद
Mumbai : कोस्टल रोडवर वाजणार 'जय हो'ची धून; देशातील पहिला 'संगीतमय रस्ता' सुरु, काय आहे खास?

"डेसिबल पातळी नियमांमध्ये असली तरी आवाजाची तीव्रता असह्य आहे. खिडक्या उघडणेही कठीण झाले आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होत आहे," असे ब्रीच कँडी रहिवासी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

BMCचा रात्रीच्या वेळी बॅरिकेडिंगचा निर्णय

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी परिसरात जाऊन आवाजाची पातळी तपासली. ती सुमारे ९ डेसिबल असून निवासी भागासाठी परवानगीच्या मर्यादेत आहे.

तथापि, रात्रीच्या वेळी आवाज अधिक त्रासदायक ठरत असल्याने पायलट प्रकल्प म्हणून शुक्रवारी ते रविवारी रात्री हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्याच्या इतर दिवशी मात्र दिवस-रात्र हा मार्ग सुरू राहणार आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी उपाय

बुधवारपासून बीएमसीने 'एल' आकारात बॅरिकेडिंग करून काही भागात वाहतूक मर्यादित केली आहे. यामागचा उद्देश म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी करणे.

काय आहे मेलोडी रोड?

भारतात पहिल्यांदाच असा मेलोडी रोड तयार करण्यात आला असून ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.

सुमारे ५०० मीटर लांबीच्या या विशेष रस्त्यावर वाहन ठराविक वेगाने गेल्यास 'स्लमडॉग मिलियनेअर' चित्रपटातील 'जय हो' हे गाणे आपोआप वाजते. या मेलोडी रोडमुळे वाहनचालक ठराविक वेगात गाडी चालवतील. अतिवेग आणि अचानक ब्रेक लावण्याचे प्रकार कमी होतील. वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत राहील. तसेच ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आनंददायी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली होती.

logo
marathi.freepressjournal.in