Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात जुलै महिन्यांतच पावसाने दमदार बॅटिंग केल्याने पाणीसाठा ८९.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज
Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात जुलै महिन्यांतच पावसाने दमदार बॅटिंग केल्याने पाणीसाठा ८९.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मे २०२७ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी आणखी १ लाख १० हजार दशलक्ष लिटरने पाण्याच्या पातळीत वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठीच १५ मे पासून लागू करण्यात आलेली १० टक्के पाणकपात मागे घेण्याबाबत मुंबई महापालिकेने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत २ ऑगस्ट रोजी १२ लाख ८९ हजार २८९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र एल निनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०० टक्के होत नाही, तोपर्यंत १० टक्के पाणीकपात लागूच असणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज
Mumbai : चिंता मिटली! धरणात ३१२ दिवसांचा ८८.४० टक्के पाणीसाठा

ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र रविवारी पावसाने उसंत घेतली. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणक्षेत्रे नाशिक, पालघर, वाडा जिल्ह्यात येत असल्याने तिथे पावसाची संततधार कायम आहे.

थोड्या शिडकाव्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही सर्व धरणे काठोकाठ भरतील, अशी शक्यता जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज
धरणातील पाणीसाठा वाढू लागला; मुंबईकरांना काहीसा दिलासा काहीसा दिलासा

सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात दोन महत्त्वाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पांजरापूर येथील क्लोरीन प्लांट एम-३ मध्ये एचएमआय (ह्यूमन मशीन इंटरफेस) पॅनल आणि क्लोरिन लीक डिटेक्टर पॅनलची पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयनासह संबंधित कामे करण्यात येणार आहेत. तसेच पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा ऊर्जा आणि विद्युत वितरणाचे सर्वंकष ऑडिटही करण्यात येणार आहे.

क्लोरिन प्लांटमध्ये बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक एचएमआय पॅनलमुळे यंत्रणेचे नियंत्रण अधिक सुलभ होणार असून क्लोरिन गळतीची त्वरित माहिती देणारी लीक डिटेक्टर प्रणालीही कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच जलशुद्धीकरण प्रक्रियेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. क्लोरिनसारख्या धोकादायक रसायनाच्या हाताळणीत ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.

२ ऑगस्ट रोजी पाणीसाठा (द. लि.)

  • अप्पर वैतरणा - १,७७,९७८

  • मोडकसागर - १,२८,९२५

  • तानसा - १,४४,४७५

  • मध्य वैतरणा - १,७७, ३६७

  • भातसा - ६,२४,८४४

  • विहार - २७,६९८

  • तुळशी - ८,००२

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज
मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम; गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के कमी पाणीसाठा, धरण क्षेत्रात पावसाची ओढ

२४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

  • अप्पर वैतरणा - ११२.०० मिमी

  • मोडकसागर - ५८.०० मिमी

  • तानसा - २५.०० मिमी

  • मध्य वैतरणा - ६६.०० मिमी

  • भातसा - ३०.०० मिमी

  • विहार - ०.०० मिमी

  • तुळशी - ९.०० मिमी

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in