"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

"आम्हाला इन्स्टाग्राम वापरता येत नाही. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला."
"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."
"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."
Published on

नवी दिल्ली : जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या नोएडातील मुलीला माफ करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी व्हिडिओद्वारे केले. त्यानंतर तिच्या आईने भावनिक प्रतिक्रिया देत, पंतप्रधानांनी आपल्या मुलीला "जीवनदान" दिल्याचे सांगत "माझ्या मुलीला दत्तक घ्या, तिचे भविष्य घडवा," अशी विनंती केली.

"माझ्या मुलीला नवं आयुष्य मिळालं"

पीटीआयशी बोलताना मुलीच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे कौतुक केले. "पंतप्रधान मोदी या देशाचे राजा आहेत. त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही. माझ्या मुलीने त्यांच्याविषयी चुकीची भाषा वापरली, तरी त्यांनी तिला माफ केले. त्यासाठी मी हात जोडून त्यांचे आभार मानते. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिला मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे पंतप्रधानांनी दिलेली माफी. त्यांनी माझ्या मुलीला जीवनदान दिलं आहे," असे मुलीच्या आईने म्हटले.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."
'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

"माझ्या मुलीला दत्तक घ्या"

भावनिक होत मुलीच्या आईने पंतप्रधान मोदींना मुलीचे भविष्य घडवण्याची विनंती केली. "मोदीजी, कृपया माझ्या मुलीला दत्तक घ्या आणि तिचे भविष्य उज्ज्वल करा. आम्हाला आमच्या मुलीच्या कृतीची लाज वाटते. आम्ही पुन्हा पुन्हा माफी मागतो," असे त्या म्हणाल्या.

एफआयआर मागे घेण्याची मागणी

मुलीविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. एफआयआरमध्ये मुलीचे वय चुकीचे नमूद करण्यात आल्याचा दावा करत, "माझी मुलगी अल्पवयीन आहे. कृपया तिच्यावरील एफआयआर मागे घ्या. आता ती तुमच्या संरक्षणाखाली आहे," असे त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटले.

सोशल मीडियावरून ट्रोलिंगचा आरोप

मुलीची आई म्हणाली की, "आम्हाला इन्स्टाग्राम वापरता येत नाही. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमच्या कुटुंबाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला."

"आमच्यासारख्या पालकांनी जगू नये, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. हे सगळं पाहून आम्ही खूप व्यथित झालो," असे त्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध घाला

१० ते २० वर्षे वयोगटातील मुले सहजपणे इतरांच्या प्रभावाखाली जातात, असा दावा करत त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या. १८ वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरण्यावर निर्बंध घालावेत. तसेच अल्पवयीन मुलांना आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासही बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

"मुलांनी शिक्षणावर लक्ष द्यावे. त्यांना समाज, संस्कृती किंवा मोठ्यांचा आदर याची पूर्ण जाणीव नसते. अनेकदा त्यांचा गैरफायदा घेतला जातो," असेही त्या म्हणाल्या.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."
"फक्त रीलमध्ये माफ करणार की गुन्हेही मागे घेणार?"; पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचा सवाल

नेमकं प्रकरण काय?

कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान संबंधित मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या प्रकरणी नोएडामध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आला होता. घटना दिल्लीत घडल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी संसद मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."
"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

पहिली आणि शेवटची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करण्याचे आणि त्यांना शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ शुक्रवारी रात्री शेअर केला होता. त्यानंतर संबंधित मुलीने व्हिडिओमार्फत माफी मागितली होती. आंदोलनादरम्यान इतरांच्या प्रभावाखाली आपण चुकीची भाषा वापरली. ही आपल्या आयुष्यातील "पहिली आणि शेवटची चूक" असल्याचे तिने म्हटले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in