नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली.
नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Published on

डोंबिवली : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ डोंबिवलीत विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत डोंबिवलीत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. सहभागी झाले होते.

नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सोनम वांगचुक यांच्यासाठी नागरिक रस्त्यावर! ठाणे, वसई, नवी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन

दरम्यान, केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेत मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नगरसेवकांनी तिरंगा फडकवून विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध केला. ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.

नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
CJP Protest : मुंबई, पुणे, नागपुरातही आंदोलनाची धग

दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मुसळधार पावसात आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ‘लोकशाहीचा खून’ असे फलक हातात घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, शहरप्रमुख कुणाल ढापरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

मुसळधार पावसात आंदोलन

ठाणे : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी ठाण्यात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ जोशी-बेडेकर महाविद्यालयाबाहेर मुसळधार पावसात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे नेते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. मात्र, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. संसदेवर मोर्चा काढताना विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

फलकबाजीवर भर

‘शिक्षणाची आता लागली वाट, धर्मेंद्र प्रधान पकडा आता घरची वाट’, ‘आवाज दाबण्यासाठी लाठी चालणार नाही’, ‘विद्यार्थी आता घाबरून मागे हटणार नाहीत’, ‘गुन्हेगारांना पाठीशी घालणे बंद करा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देऊन रस्ता मोकळा करा’, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. यावेळी न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

कर्जतमध्ये निषेध रॅली

कर्जत : दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कर्जत, नेरळ, कडाव, कशेळे आणि कळंब येथील व्यापारी, व्यावसायिक, नागरिक आणि विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याने बाजारपेठा बंद राहिल्या. यानिमित्त बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली.

रत्नागिरीत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप

रत्नागिरी : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, युवक, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरला.

‘शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा’, ‘हुकूमशाही सरकारचा निषेध असो’, ‘विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा’, ‘सरकार होश में आओ’, अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी आणि राजापूर येथील दोन तरुणींनी नीट परीक्षा दिल्यानंतर आलेल्या संकटांचा अनुभव सांगितला.

जंतरमंतरवरील आंदोलनाला मीरा-भाईंदरकरांचा पाठिंबा

भाईंंदर : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांनी शहीद कौस्तुभ राणे चौकात आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थी, तरुण, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी हातात विविध संदेशांचे फलक घेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा’ आणि ‘विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

वंबआच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना

विरार : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान, विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विरार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ‘आम्हाला आमचे आंदोलन करू द्या. आम्हाला ताब्यात घेऊ नका,’ अशी विनंती कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांच्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अलिबागमध्ये तरुणाईचा एल्गार

अलिबाग : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आले.

चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहाच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, युवक-युवती, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भिवंडीत काँग्रेसची निदर्शने

भिवंडी : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in