आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १५ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 15, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा.

वृषभ - आपण घेत असलेल्या परिश्रमांची चा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्‍यता राहील.

कर्क - इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह - स्थावर मालमत्ते संबंधी प्रश्न सोडवले कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतीलकौटुंबिक नाराजी दूर कराल.

कन्या - मनोबल चांगले असल्यामुळे, मनातील अनेक योजना साकार करणे शक्य होईल. स्थावर मालमत्ते संबंधी चे प्रश्न सोडवा. नोकरदारांना दिवस चांगला. जोडीदाराशी जुळवून घ्या.

तुळ - आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमांचे कटाक्षाने पालन करा. कोणत्याही प्रसंगांनी वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

वृश्चिक - आजच्या दिवसात आनंदाचे क्षण उपभोगायला. अपेक्षित आनंदित घटना घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. विवाह ठरण्याचे योग आहेत. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

धनु - आज आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त लक्ष घालणार आहात. व्यवसायातील लोकांना धावपळीचा दिवस. मनातील योजना साकार करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मकर - आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सल्लागार म्हणून काम करता येईल.

कुंभ - आपल्या वागण्यामुळे बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, नीट लक्षपूर्वक काळजी घेणे आवश्यक.

मीन - सर्व बाबतीत निर्णय शांतपणे व विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.

शिल्पकार राम सुतार यांना १०० व्या वर्षी 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' प्रदान

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

मालेगाव बाॅम्बस्फोटप्रकरणी आरोपींना नोटीस; सुनावणी दोन आठवडे तहकूब

शक्तीपीठ महामार्गाला ६ तालुके ६१ गावांचा विरोध कायम; कोल्हापूरमधून जाणारा ११० किमी अंतराचा रस्ता वादामुळे रखडला