आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - शुभ ग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे. मोठ्या आर्थिक योजना आपण अमलात आणणार आहात. त्यासाठी आपणास सहकारी व मित्रपरिवार यांचा सहयोग मिळणार आहे.

वृषभ -आपले कामाचे नियोजन विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. वास्तवतेचा विचार करा. यशाकडे वाटचाल करणार आहात.

मिथुन - नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे आनंदाने कामे कराल.व्यवसायिक नवीन करार कराल, नवीन करार करताना दक्ष राहणे आवश्यक आहे.

कर्क - निराशेची छाया जाणवेल.वादविवादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. नोकरीमध्ये तणावाचे वातावरण असू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती सांभाळा.

सिंह - आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. योजलेली कामे नीट पणे व सुरळीत पणे होतील. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. जोडीदाराचे विशेष सहकार्य लाभेल.

कन्या - नोकरीमध्ये काम करताना, आपली मानसिकता द्विधा असेल. कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे कळणार नाही, काम खूप असल्याने कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे.

तुळ - शुभ ग्रहांची आपल्याला साथ लाभणार आहे. आपल्या कष्टांना यश येणार आहे. एखादे निश्चित ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहात.

वृश्चिक -आपल्या व्यापार व्यवसायामध्ये काही प्रश्नांची उत्तरे आपणास समाधानकारक मिळणार आहे. जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.

धनु - नातेसंबंध सुधारणा होणार आहे.आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील.व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी आपले प्रयत्न यशस्वी होतील.

मकर -आजचा आपला दिवस समाधानकारक असणार आहे.नोकरी-व्यवसाय व्यवस्थित असल्याकारणाने आर्थिक प्रश्न राहणार नाहीत त्यामुळे कुटुंबामध्ये शांतता राहणार आहे.

कुंभ - आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे नवीन नवीन योजना समोर आल्या तरी, कुठल्या घ्याव्या याचा प्रश्न पडला पडणार आहे, नीट अभ्यास करून संधीचा फायदा घ्यावा.

मीन -आपल्याला आपल्या कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कामात चुका होऊ देऊ नका. व्यवहार करताना नियम व अटी यांचा अवलंब काटेकोरपणे करावा.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट